सलग दुसऱ्याही वर्षी समर्पणच्या तीन विद्यार्थ्यांना मेडिकलला प्रवेश
उदगीर (प्रतिनिधी) : येथील 12वी बोर्ड, एमएच-सीईटी, आयआयटी- जेईई आणि नीट परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करून पदार्पणातच नावारूपास आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये जिद्द आत्मविश्वास आणि अथक परिश्रमाचे बिज पेरणाऱ्या “समर्पण करिअर इन्स्टिट्यूट उदगीर” च्या विद्यार्थ्यांनी सलग दुसऱ्याही वर्षी निकालाची परंपरा कायम राखत मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळविला आहे. त्यात विशेष म्हणजे समर्पण चे संचालक प्रा. अविनाश प्रभातराव पाटील शिकवीत असलेल्या बायोलॉजी विषयांत उदगीर तालुक्यातील डांगेवाडी गावचा पहिली ते दहावी खेडेगावात शिक्षण घेतलेला, 11वी व 12वी सर्वच विषय समर्पणमध्ये शिकलेला विद्यार्थी कृष्णा गोविंदराव लोणे याने राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा नीट 2021 मध्ये बायोलॉजी या विषयात 360 पैकी तब्बल 350 गुण घेऊन देशांमध्ये सहावा येण्याचा मान पटकावला आहे. कुंटे अजय याने नीट मध्ये 559 गुण घेवुन पहिल्याच यादीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद येथे एमबीबीएस साठी प्रवेश मिळवला आहे. तर कृष्णा गोविंदराव लोने व ज्ञानेश्वरी तुकाराम राखुंडे या विद्यार्थ्यांनी बीएएमएस साठी प्रवेश मिळवला आहे. आई वडील आणि समर्पण मध्ये मिळालेल्या मोलाच्या मार्गदर्शनामुळेच हे यश संपादन झाले आहे. या यशाचं सर्व श्रेय समर्पण करिअर इन्स्टिट्युट उदगीर च्या समर्पण पॅटर्नला, युनिक टिचींग मेथडला आणि विद्यार्थ्यांच्या जिद्दीला व प्रामाणिक मेहनतीला आहे. समर्पणच्या या यशवंत विद्यार्थ्यांच सर्वच स्तरांतून कौतुक केलं जातं आहे.
