लातूर (एल पी उगीले) गरुड चौक, लातूर येथील सुप्रीम टायर्स दुकानाच्या गोडाऊनमधून ट्रॅक्टर, ट्रक तसेच जेसीबीचे टायर चोरीस गेल्याच्या गुन्ह्याचा विवेकानंद चौक पोलिसांनी छडा लावला असून, एका आरोपीस ताब्यात घेऊन चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी ३७ टायर, असा एकूण ४ लाख ६४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे विवेकानंद चौक, लातूर येथे गु.र.नं. ७०२/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दि. १ मार्च २०२६ ते दि. ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत गरुड चौक येथील सुप्रीम टायर्सच्या गोडाऊनमधून अज्ञात व्यक्तीने ट्रॅक्टर, ट्रक व जेसीबीचे टायर चोरी करून नेल्याचे तपासात समोर आले.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार करण्यात आले.
तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय बातमीदारांचे जाळे सक्रिय करून तसेच शास्त्रीय व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. त्यातून अबरार अनस शेख, (रा. बरकत नगर कमान, लातूर) यास निष्पन्न करून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या तपासातून चोरीस गेलेल्या मालापैकी ट्रॅक्टर, ट्रक व जेसीबीचे वेगवेगळे एकूण ३७ टायर, अंदाजे ४ लाख ६४ हजार रुपये किमतीचे, जप्त करण्यात आले. तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अशाप्रकारे सदर गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही कारवाई पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एस. ए. पुरी, सहाय्यक फौजदार रविंद्र गोंदकर, पोलीस अंमलदार कांबळे, खुर्रम काझी, गणेश यादव, रणवीर देशमुख, यशपाल कांबळे, योगेश गायकवाड, सचिन राठोड व सोनकांबळे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.














Responses (0 )