Police Flash News

सार्वजनिक ठिकाणी धारदार कोयता घेऊन फिरणाऱ्यास विवेकानंद चौक पोलिसांकडून अटक.

0
15
सार्वजनिक ठिकाणी धारदार कोयता घेऊन फिरणाऱ्यास विवेकानंद चौक पोलिसांकडून अटक.

लातूर (एल पी उगीले) सार्वजनिक ठिकाणी धारदार लोखंडी कोयता बाळगणाऱ्या इसमास विवेकानंद चौक पोलिसांनी कारवाई करून ताब्यात घेतले. आरोपीकडून धारदार लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार संतोष कलबोने पोलीस ठाणे विवेकानंद चौक, लातूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु.र.नं. ७०८/२०२६, कलम ४, २५ शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुनाथ नामदेव कांबळे (वय ४७ वर्षे), रा. पठाण हॉस्पिटल, मेघराज नगर, लातूर हा दिनांक ३ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ११.४५ वाजता आनंद नगर, बौद्ध विहार परिसरातील रस्त्यावर धारदार लोखंडी कोयता बाळगताना आढळून आला. पोलिसांनी आरोपीकडून धारदार लोखंडी कोयता जप्त केले आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक अरविंद संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पी. बी. वांगे करीत आहेत.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts