Police Flash News

बसस्थानकांवरील गर्दीचा फायदा घेत दागिने चोरणाऱ्या दोन महिला ताब्यात.

0
78
बसस्थानकांवरील गर्दीचा फायदा घेत दागिने चोरणाऱ्या दोन महिला ताब्यात.

लातूर (एल पी उगीले) लातूर सह

अहमदपूर व भादा येथील चोरीच्या ८ गुन्ह्यांची उकल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाने करून दाखवली आहे. तसेच १०.०६ लाख रुपये किमतीचे सोन्याचे ७८.१५ ग्रॅम दागिने जप्त केले आहेत.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, बसस्थानकांवर बसमध्ये चढताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दोन महिलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुरूड-अकोला बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विविध बसस्थानकांवरील चोरीच्या गुन्ह्यांशी संबंधित तब्बल १० लाख ०६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशांवर अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बसस्थानकांवरील चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेत होते. दि. २ ऑक्टोबर रोजी पथकाला मुरूड-अकोला बसस्थानक येथे दोन महिला संशयास्पदरीत्या थांबलेल्या असल्याची गोपनीय माहिती मिळाली.माहितीची खात्री करून पोलिसांनी दोन्ही महिलांना ताब्यात घेत त्यांची झडती घेतली. त्यांच्या जवळील पिशवीत हिरवट रंगाच्या स्कार्फमध्ये गुंडाळून ठेवलेले सोन्याचे दागिने आढळून आले. दागिन्यांबाबत समाधानकारक माहिती न दिल्याने पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, त्यांनी लातूर जुने बसस्थानक, अहमदपूर व भादा येथील बसस्थानकांवर बसमध्ये चढण्यासाठी गर्दी झालेल्या ठिकाणी प्रवाशांचे दागिने चोरी केल्याची माहिती दिली. त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांची पडताळणी केली असता, जप्त करण्यात आलेले दागिने विविध चोरीच्या गुन्ह्यांशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले.

ताब्यात घेण्यात आलेल्या महिला आरोपी स्वाती उर्फ रविना उमाकांत तपसाळे, (वय ३५ वर्षे, रा. आष्टा जहांगीर, ता. उमरगा, जि. धाराशिव, ह.मु. संगम दाळमिल शेजारी, ठोंबरे नगर, मुरूड),महादेवी सर्जेराव देडे, (वय ४० वर्षे, रा. न्यू जय नगर, मळवटी रोड, लातूर). असे असून त्यांच्याकडून गांधी चौक पोलीस ठाणे २ गुन्हे,अहमदपूर पोलीस ठाणे ४ गुन्हे, भादा पोलीस ठाणे २ गुन्हे मधील चोरलेला १०.०६ लाख रुपये किमतीचे सोन्याचे ७८.१५ ग्रॅम सोन्याची दागिने जप्त करण्यात आले आहे.

ही कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे पोलीस अंमलदार रसूल पठाण, विनोद चलवाड, प्रशांत स्वामी, सुरेश कलमे, राजेश कंचे, गोविंद येलमटे,आनंद हल्लाळे, प्रेमदास राठोड, गोविंद भोसले, तुळशीराम बरूरे, सुरेखा मदने, अंजली गायकवाड, चंद्रकांत केंद्रे यांच्या पथकाने केली.

दोन्ही महिला आरोपी व जप्त मुद्देमाल गांधी चौक पोलीस ठाणे गु.र.नं. २४६/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये दाखल गुन्ह्यात पुढील कायदेशीर कारवाई साठी हजर करण्यात आले आहेत.

S
WRITTEN BY

Superadmin

Related posts