Police Flash News

गृहभेट व आरोग्य तपासणी शिबिरात शंभर जणांची तपासणी,व्यंकटेश चौधरी कॅालेज ॲाफ नर्सिंग, एकुर्का रोड चा उपक्रम.

0
19
गृहभेट व आरोग्य तपासणी शिबिरात शंभर जणांची तपासणी,व्यंकटेश चौधरी कॅालेज ॲाफ नर्सिंग, एकुर्का रोड चा उपक्रम.

उदगीर (एल पी उगीले) तालुक्यातील क्षेत्रफाळ येथे समर्थ एज्युकेशन सोसायटी, डोंगरशेशकी द्वारा संचलित व्यंकटेश चौधरी कॅालेज ॲाफ नर्सिंग, एकुर्का रोड च्या वतीने गुरुवारी घेण्यात आलेल्या गृहभेट व आरोग्य तपासणी शिबिरात एकुण शंभर जणांची तपासणी करण्यात आली.

अध्यक्षस्थानी संस्था सदस्य, नर्सिंग कॅालेज चे संचालक प्रयास चौधरी उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तंटामुक्त समिती अध्यक्ष तानाजी हरमुंजे, ग्राम रोजगार सहाय्यक माधव संगमे, अजय बिरादार, लक्ष्मण बिरादार, जि. प. प्रा. शा. चे मुख्याध्यापक सुनिल पटवारी, तलाठी गजानन मुळे, कृषी सहायक हाणमंत म्हेत्रे, बी. एल. ओ. शिवा पाटील, अंगणवाडी शिक्षिका उषा सोनटक्के, नर्सिंग चे प्रा. डी. एस. कांबळे, प्रा. अनिता जाधव, एन. एस. मठवाले, वर्षा कवडगावे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनी उपस्थित होते. नर्सिंग कॅालेज च्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी २० जणांची मधुमेह तपासणी, ३० जणांची उच्च रक्तदाब तर ५० जणांच्या शरीराचे तापमान तपासणी केली. या गृहभेट व तपासणी शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts