Police Flash News

गांधीजींच्या सत्य-अहिंसेचा, शास्त्रीजींच्या साधेपणाचा विद्यार्थ्यांना संदेश दिला

0
17
गांधीजींच्या सत्य-अहिंसेचा, शास्त्रीजींच्या साधेपणाचा विद्यार्थ्यांना संदेश दिला

उदगीर (प्रतिनिधी) तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी प्राथमिक विद्यालय, निडेबन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा व स्वच्छतेच्या विचारांचा तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा व देशसेवेचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त आदर्श शिक्षक रमाकांत बनशेळकीकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक विश्वनाथरावजी मुडपे, समाजसेवक पांडुरंग फुलसे, सेवानिवृत्त आदर्श शिक्षक सूर्यकांत पांचाळ तसेच संस्थेचे सचिव देविदासरावजी नादरगे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव देविदासरावजी नादरगे यांनी केले. पांडुरंग फुलसे यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित गीत सादर केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विश्वनाथरावजी मुडपे यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला, तर रमाकांत बनशेळकीकर यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण गायकवाड यांनी केले, तर आभार विजयकुमार पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक उमेश नादरगे , अधीक्षक शरेशचंद्र पांचाळ, अमोल कांबळे , श्रीमती आयोध्या पाटील, श्रुती गोपडे व पुनम पांचाळ यांनी परिश्रम घेतले.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts