उदगीर (एल पी उगीले) येथील दि.लिं. होळीकर प्रतिष्ठान, उदगीर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दि.लिं. होळीकर स्मृती व्याख्यानमालेच्या १३व्या पुष्पाचे आयोजन रविवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता करण्यात आले आहे. ‘कृषी सुधारणा कायदे आणि बाजार समितीचे भविष्य’ हा व्याख्यानाचा विषय असून ऑल इंडिया किसान कोऑर्डिनेशन कमिटीचे सरचिटणीस तथा एमएसपी समितीचे सदस्य गुणवंतराव पाटील हंगरगेकर प्रमुख व्याख्याते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
शासकीय विश्रामगृह सभागृह, रेल्वे स्टेशन रोड, उदगीर येथे हा कार्यक्रम होणार आहे. कृषी क्षेत्रातील बदलते धोरण, शेतमालाच्या बाजारपेठेतील बदल, कृषी उत्पन्न बाजार समित्यांची भूमिका आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने बाजारव्यवस्थेचे भवितव्य या विषयांवर या व्याख्यानातून विचारमंथन होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समिती, उदगीरचे सभापती शिवाजी आण्णा हुडे राहणार आहेत. यावेळी दि.लिं. होळीकर स्मृती शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून हा पुरस्कार जि.प. प्रशाळा, डिगोळ येथील सहशिक्षक सौ. अनिता घोणे यांना देण्यात येणार आहे.
दि.लिं. होळीकर प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक जीवनातील महत्त्वाच्या विषयांवर वैचारिक संवाद घडवून आणण्याच्या उद्देशाने या व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. कृषी क्षेत्रातील सध्याच्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या व्याख्यानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या कार्यक्रमास उदगीर परिसरातील नागरिक, शेतकरी, शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते तसेच कृषी क्षेत्राशी संबंधितांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दि.लिं. होळीकर प्रतिष्ठान, उदगीर, जि. लातूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.














Responses (0 )