लातूर (एल पी उगीले ) शहरातील अवैध जुगार अड्ड्यांविरोधात कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बाभळगाव चौक ते राजीव गांधी चौक मार्गावरील रिंग रोड परिसरात सुरू असलेल्या ‘तिर्रट’ जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत १० जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण ७२ हजार ७०० रोख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान एक जण पोलिसांना पाहून फरार झाला.
दि. १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास बाभळगाव चौक लातूर ते राजीव गांधी चौक लातूर जाणाऱ्या रिंग रोडवरील गोजमगुंडे मंगल कार्यालयाच्या बाजूला लगजकर यांच्या शेतातील मोकळ्या जागेतील झाडीमध्ये काही जण ‘तिर्रट’ जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. माहितीची खात्री करून पंचांना सोबत घेत सायंकाळी सुमारे ५.३० वाजता संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. यावेळी १० जण दोन गोलाकार रिंगणात बसून तिर्रट जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच दुसऱ्या रिंगणातील हसन शेख, रा. लातूर हा इसम घटनास्थळावरून पळून गेला.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून त्यांच्या अंगझडतीत तसेच दोन्ही रिंगणांच्या मध्यभागातून जुगाराचे पत्ते आणि रोख रक्कम असा एकूण ७२,७०० रोख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी अमजद बाबू पठाण, (वय ३२ वर्षे, रा. सम्राट चौक, वडार गल्ली, लातूर), वैजनाथ नागनाथ काळे, (वय ३५ वर्षे, रा. आनंद नगर, तानाजी चौक, लातूर),बलदेव रामसिंग बावरी, (वय ३२ वर्षे, रा. वीर हणमंतवाडी, मार्केट यार्ड, लातूर),बबलू सुरेश गायकवाड, (वय ३३ वर्षे, रा. बौद्धनगर, लातूर),शिवा बाबुसिंग बावरी, (वय २७ वर्षे, रा. वीर हणमंतवाडी, मार्केट यार्ड, लातूर), सिद्धार्थ संजय सिरसाट, (वय २६ वर्षे, रा. बौद्धनगर, लातूर),जमीर गौस बागायन, (वय २४ वर्षे, रा. शाहुअली मोहल्ला, साठफुटी रोड, लातूर),नवीन रविंद्र लोंढे, (वय २८ वर्षे, रा. सम्राट चौक, लातूर),अजय आनंद कांबळे, (वय २५ वर्षे, रा. बौद्धनगर, लातूर), याजीद हाकानी शेख, (वय ३४ वर्षे, रा. बरकतनगर, लातूर),हसन शेख, (रा. लातूर(फरार.)) याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सपोनि पांडुरंग माने, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, राजाभाऊ घाडगे, पोलीस अंमलदार युवराज गिरी, विनोद चलवाड, मोहन सुरवसे, प्रदीप स्वामी, राहुल कांबळे, जमीर शेख, प्रेमदास राठोड, प्रविण कोळसुरे, तुळशीराम बरुरे यांनी केली आहे.
लातूर जिल्ह्यातील अवैध जुगार, मटका व इतर अवैध धंद्यांविरोधात प्रभावी कारवाई सुरू असून, अशा गैरप्रकारांची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.














Responses (0 )