Police Flash News

उदयगिरीत गांधीजी शास्त्रीजी जयंती विविध उपक्रमांनी साजरी

0
33
उदयगिरीत गांधीजी शास्त्रीजी जयंती विविध उपक्रमांनी साजरी

उदगीर (प्रतिनिधी) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात महात्मा गांधीजी जयंतीनिमित्त सर्वप्रथम शहरातील गांधी उद्यानात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी आणि महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. महात्मा गांधीजींच्या 156 व्या जयंती निमित्ताने 'अजूनही महात्मा गांधी का मरत नाहीत' या विषयावर बसवराज पाटील नागराळकर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. परिसंवादात प्रा. डॉ. दीपक चिद्दरवार, प्रा. विलास काकनाळे, प्रा. सुनंदा रोडगे, विद्यार्थिनी कु.सय्यदा माहिन तलत, विद्यापीठ प्रतिनिधी कु. असिया पठाण, कु. प्रियांका भिसे यांनी आपले विचार मांडले. यावेळी वक्त्यांनी बोलताना सांगितले की, 'महात्मा गांधीजी अजूनही मरत नाहीत' कारण त्यांच्या उपदेशांनी आणि जीवनशैलीने भारतीय समाजाला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी मूल्यांना इतका ठोस व दीर्घकालीन आधार दिला आहे की ते काळाच्या पटलावर टिकले आहेत. सत्य, अहिंसा, स्वावलंबन आणि साधेपणा हे केवळ नैतिक विचार नसून व्यवहारात उतरवण्यासारखे तत्व होते, ज्यांनी व्यक्तींना तसेच सर्वसमाजाला बदलण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली दाखवलेले तत्त्वज्ञान लोकशाही, सामाजिक न्याय आणि बंधुत्व या आदर्शांसोबत जोडले गेले; त्यामुळे शैक्षणिक व सामाजिक चर्चा, सार्वजनिक धोरणे आणि दैनंदिन नीतिनियमानांमध्ये गांधीवादी विचार आजही जीवंत आहेत. शिवाय त्यांच्या जीवनाचे उदाहरण, व्यक्तीगत त्याग, सेवाभाव आणि सत्यनिष्ठा संस्थात्मक व वैयक्तिक पातळीवर हे सिद्धांत अमलात आणण्यासाठी सुस्पष्ट आदर्श म्हणून उपयोगी पडतात. म्हणूनच भौतिकरित्या त्यांनी आपल्या जगायला सामर्थ्य गमावले असले तरी, त्यांच्या मूल्यांचा प्रभाव आणि संदेश काळानुरूप वाढत चाललेला दिसतो; त्या अर्थाने महात्मा गांधी आजही अमर आणि आवश्यक आहेत. अध्यक्षीय समारोपात नागराळकर म्हणाले, गांधीजींच्या विचाराला जपण्याचा मार्ग म्हणजे त्यांच्या विचारांचा केवळ गौरव न करता, ते आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. परिसंवादाचे प्रास्ताविक प्राचार्य आर. के. मस्के यांनी केले, सूत्रसंचालन कु. पूजा कुलकर्णी यांनी तर आभार प्रा. डॉ. एम. जे. कुलकर्णी यांनी मानले. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, उपाध्यक्ष बसवराज पाटील मलकापूरकर, सहसचिव प्रशांत पेन्सलवार संस्था सदस्य शिवराज वल्लापुरे, प्रा. आडेप्पा अंजुरे, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे तथा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts