Police Flash News

उदगीर येथे लायन्स स्टडी सेंटरचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

0
37
उदगीर येथे लायन्स स्टडी सेंटरचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

उदगीर (एल पी उगीले)

विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शांत व पोषक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने लायन्स क्लब, उदगीर आणि उदयगिरी लायन्स आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने 'लायन्स स्टडी सेंटर' चा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.

या लोकार्पण सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. आर. एन. लखोटिया, प्रोजेक्ट चेअरमन ॲड. बालाजी अदेप्पा, लायन्स अध्यक्ष सौ. स्मिता लखोटिया, दीपक जोशी, विवेक जैन, प्रवीण मुंदडा, महेश बसपुरे आणि लक्ष्मीकांत गुडमेवार हे मान्यवर उपस्थित होते.

अभ्यासासाठी उत्तम वातावरण व सुविधा:

घरी अभ्यासासाठी जागा नसणे, गोंधळ असणे किंवा अभ्यासात लक्ष न लागणे अशा समस्यांवर मात करण्यासाठी लायन्स क्लबने हे स्टडी सेंटर सुरू केले आहे. या सेंटरमध्ये इयत्ता ९ वी ते पदव्युत्तर विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे परीक्षार्थी तसेच अभ्यासाची आवड असणाऱ्या महिलांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

​स्टडी सेंटरची प्रमुख वैशिष्ट्ये व सुविधा:

​वेळ: सकाळी ९:०० ते संध्याकाळी ७:०० पर्यंत. स्थळ: लायन्स नेत्रालय परिसर, नांदेड नाका मागे, उदगीर.

​उपक्रम: स्पोकन इंग्लिश वर्ग (साप्ताहिक) आणि करिअर कौन्सिलिंग टॉक (मासिक).

​विशेष सुविधा: वर्तमानपत्र वाचन कोपरा, शांत व सुरक्षित वातावरण.

​या अभ्यासिकेचा लाभ शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी घ्यावा, आणि आजच आपली नोंदणी निश्चित करावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. संपर्क आणि नोंदणीसाठी प्रा. डॉ. स्मिता लखोटिया (९४२२४६८६२२) व प्रा. डॉ. पद्मा जोशी (७६२०००६४२२) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन लायन्स क्लब उदगीर कडून करण्यात आले आहे

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts