Police Flash News

लाल बहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री जयंती उत्साहात साजरी.

0
8
लाल बहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री जयंती उत्साहात साजरी.

उदगीर (एल पी उगीले) भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लाल बहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभाग प्रमुख सुधाकर पोलावार होते. प्रमुख वक्ते म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे, तर प्रमुख पाहुण्या म्हणून सेवाज्येष्ठ शिक्षिका श्रीदेवी कबाडे उपस्थित होत्या.मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी प्रमुख वक्ते मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा, स्वच्छता, स्वावलंबन व सत्याग्रहाच्या विचारांवर प्रकाश टाकला. गांधीजींनी सत्य व अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याला व्यापक स्वरूप दिले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनातून सत्य, अहिंसा, साधेपणा व स्वच्छतेचे संस्कार आत्मसात करावेत, असे त्यांनी सांगितले.लाल बहादुर शास्त्री यांच्या जीवनकार्याविषयी बोलताना ते म्हणाले की, शास्त्रीजी हे साधेपणा, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रभक्तीचे आदर्श होते. ‘जय जवान, जय किसान’ हा त्यांचा संदेश देशाच्या सुरक्षेसोबतच अन्ननिर्मितीचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे. विद्यार्थ्यांनी कष्ट, शिस्त, प्रामाणिकपणा आणि देशप्रेम या मूल्यांचा अंगीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय समारोप करताना विभाग प्रमुख सुधाकर पोलावार म्हणाले की, महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री हे भारतीय समाजाला मूल्याधिष्ठित जीवनाचा मार्ग दाखविणारे महान व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या विचारांचे केवळ स्मरण न करता ते आपल्या आचरणात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. विद्यार्थ्यांनी स्वच्छता, शिस्त, सत्य, अहिंसा, श्रमप्रतिष्ठा व राष्ट्रप्रेम या मूल्यांना आपल्या जीवनाचा भाग बनवावा, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुनेजा मठपती यांनी मानले.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts