Police Flash News

शिवाजीनगर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी,महिनाभरात २१ हरवलेले मोबाईल शोधून मूळ मालकांच्या स्वाधीन

0
13
शिवाजीनगर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी,महिनाभरात २१ हरवलेले मोबाईल शोधून मूळ मालकांच्या स्वाधीन

लातूर (एल पी उगीले) येथील

शिवाजीनगर पोलीस ठाणे, लातूर हद्दीत विविध ठिकाणी हरवलेले मोबाईल फोन शोधून काढण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आले असून, तब्बल २१ मोबाईल फोन हस्तगत करून ते त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

हरवलेल्या मोबाईल फोनबाबत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत शिवाजीनगर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या माध्यमातून मोबाईल फोनचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करत विविध ठिकाणांहून २१ हरवलेले मोबाईल फोन शोधून काढले.

शोधून काढण्यात आलेले मोबाईल फोन आज संबंधित मूळ मालकांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्या ताब्यात देण्यात आले. आपला हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी शिवाजीनगर पोलिसांचे आभार व्यक्त केले.

ही उल्लेखनीय कारवाई लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, विभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे आणि पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार लक्ष्मण कांदे, नारायण शिंदे, परमेश्वर अंकुलगे, किशोर माने आणि जब्बार पटवारी यांनी केली.

हरवलेली वस्तू शोधून ती सुरक्षितपणे मूळ मालकापर्यंत पोहोचविण्याच्या या कार्यातून शिवाजीनगर पोलिसांची नागरिकांप्रती असलेली बांधिलकी आणि तत्परता अधोरेखित झाली आहे.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts