Police Flash News

ज्ञानेश्वर पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

0
75
ज्ञानेश्वर पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या लातूर  जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

लातूर (एल पी उगीले) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाने लातूर ग्रामीणच्या संघटनात्मक बांधणीला बळ देण्यासाठी संघटन कुशल नेतृत्व असलेले ज्ञानेश्वर पाटील दावणगावकर यांची लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत जयवंतराव शिंदे यांनी अधिकृत नियुक्तीपत्राद्वारे ही घोषणा केली.

ज्ञानेश्वर पाटील यांना दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य, दावणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उदगीर तालुकाध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यांना तसा पक्ष बांधणीचा दांडगा अनुभव आहे. ग्रामीण भागातील संघटनात्मक कामाचा प्रदीर्घ अनुभव आणि कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क लक्षात घेता त्यांच्यावर आता संपूर्ण लातूर ग्रामीण जिल्ह्याची पक्ष संघटना मजबूत करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

पक्षाची विचारधारा आणि शरदचंद्र पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासोबतच नव्या कार्यकर्त्यांना संघटनेशी जोडणे, पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे आणि ग्रामीण भागात पक्षाची भक्कम बांधणी करणे, हे त्यांच्या पुढील वाटचालीतील प्रमुख उद्दिष्ट असणार आहे.

ज्ञानेश्वर पाटील यांच्या नियुक्तीमुळे उदगीर तालुक्यासह लातूर ग्रामीणमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटनेला नवी ऊर्जा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, त्यांच्या नियुक्तीचे पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts