उदगीर (प्रतिनिधी )-- भारतीय जनता पार्टी लातूर (ग्रामीण) भटक्या-विमुक्त मोर्चाच्या नवीन जिल्हा कार्यकारिणीची घोषणा जिल्हाध्यक्ष बालाजी केंद्रे यांनी पक्षश्रेष्टीच्या आदेशानुसार केली आहे. लातूर ग्रामीण जिल्हा सरचिटणीसपदी देवर्जन येथील भाजपा चे कार्यकर्ते रामस्वामी बसप्पा कुसळकर (उदगीर) यांची निवड केली आहे. कुसळकर हे उदगीर तालुक्यातील देवर्जन येथील भाजपा चे निष्ठावंत कार्यकर्ते असून, त्यांनी या पूर्वी भाजपाच्या भटक्या-विमुक्त मोर्चाचे उदगीर तालुका अध्यक्ष म्हणून उत्तम काम केले आहे. त्याचबरोबर देवर्जन येथील जिल्हा परिषद शाळेच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्ष म्हणून उत्तम काम केले. या सर्व कामाची दखल घेऊन त्याची निवड करण्यात आली आहे.
कुसळकर यांची निवड झाल्याबदल भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. बसवराज पाटील मुरुमकर, आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. रमेशअप्पा कराड, आ. अभिमन्यू पवार, रामचंद्र तीरुके, प्रा. पंडित सूर्यवंशी, किसान आघाडी चे प्रदेश कार्यकरणी सदस्य बसवराज रोडगे, भाजपा चे जिल्हा सरचिटणीस अमोल निडवदे, शंकर रोडगे, दत्ता खटके,अविनाश नळंदवार व मनोहर भंडे आदींनी अभिनंदन केले.
नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून भटक्या-विमुक्त समाजाशी संपर्क वाढवून पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.कुसळकर यांच्या निवडीबादल सर्वत्र अभिनंदन होत आहे.














Responses (0 )