उदगीर (एल पी उगीले) येथील
मातृभूमी विद्या संकुल संचलित गोल्डन गेट पब्लिक स्कूल, उदगीरच्या वतीने जागतिक हृदय दिनाचे औचित्य साधून दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी स्पंदन हॉस्पिटल, उदगीर येथे शैक्षणिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते. ही भेट अतिशय यशस्वी झाली.
यावेळी डॉ. सुनील माने , प्रिया माने आणि त्यांच्या संपूर्ण टीमने आमच्या विद्यार्थ्यांचे छान आणि सकारात्मक पद्धतीने स्वागत केले. शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन डॉ. सुनील माने,डॉ. सोनाळे, डॉ.देलमटे व त्यांच्या टीमला जागतिक हृदय दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
डॉ. सुनील माने यांनी मुलांना हृदय दिनानिमित्त हृदयाची काळजी कशी घ्यायची,रोज व्यायाम करावा, हृदयासाठी जंक फूड किती हानिकारक आहे, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच हृदयावर उपचार कसे केले जातात? आणि त्यासाठी लागणारी उपकरणे त्यांनी प्रत्यक्ष दाखवून त्याची व्यवस्थित माहिती विद्यार्थ्यांना दिली. डॉ. माने मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना सुंदर असे मार्गदर्शन केले.
तेथे असलेल्या रुग्णांची तब्येत लवकर ठीक व्हावी व गुलाब हे आनंदाचे प्रतीक असते, या हेतूने सर्व विद्यार्थ्यांनी रुग्णांना एक-एक गुलाब पुष्प दिले. ते गुलाब पुष्प पाहून त्या रुग्णांच्या चेहऱ्यावर जो आनंद आला होता, तो शब्दात सांगणे कठीण आहे. तेथील नर्स, वॉर्ड बॉय यांनाही गुलाब देऊन त्यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले.
डॉ. माने यांनी हॉस्पिटलच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांसाठी हेल्दी ब्रेकफास्टची व्यवस्था केली होती.
डॉक्टरांनी त्यांच्या अतिशय बिझी शेड्युलमधून आमच्या विद्यार्थ्यांसाठी वेळ काढला व त्यांना मार्गदर्शन केले, त्याबद्दल शाळेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष सतिश जी उस्तुरे व संचालिका सौ. उषा कुलकर्णी-उस्तुरे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
तसेच शाळेच्या प्रचार्या दीपिका बियदार, व ऍडमिन स्वाती भांगे यांनी नियोजन केले, तसेच प्रणिता डिगोळे, अश्विनी कडोळे, अर्चना चव्हाण, शिल्पा पवार, नंदा चाफेकरंडे, माधवी शिनगारे, नेहा आचार्या, नीता गुंडरे, रत्नदीप मादळे, कैलास मुंडे, खुशाल बिराजदार व शाळेतील शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.














Responses (0 )