Police Flash News

लोककला महोत्सवात बालकलाकारांचा जल्लोष; विविध स्पर्धांमध्ये बालकलाकारांनी रसिकांची मने जिंकली

0
5
लोककला महोत्सवात बालकलाकारांचा जल्लोष; विविध स्पर्धांमध्ये बालकलाकारांनी  रसिकांची मने जिंकली

लातूर (एल पी उगीले) महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचे दर्शन घडविणारा ‘जल्लोष लोककलेचा’ हा लोककला महोत्सव बालकलाकारांच्या उत्साहात जल्लोषात पार पडला. २७ व २८ ऑक्टोबर रोजी दगडोजीराव सभागृहात आयोजित या महोत्सवातील विजेत्यांचा सोमवारी पारितोषिक वितरण समारंभ झाला. विविध लोककला प्रकारांमध्ये बालकलाकारांनी सादरीकरण करत आपल्या कलागुणांची प्रभावी छाप पाडली.

२९ बालरंगभूमी परिषद, लातूर शाखेच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पारितोषिक वितरण समारंभास बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे, नाट्यपरिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. दीपक वेदपाठक, प्रा. संदीप जगदाळे, अनिल पुरी, मयुर बनसोडे, भारत थोरात, श्रद्धा केंद्रे आणि बालरंगभूमी परिषद लातूर शाखेचे अध्यक्ष रणजित आचार्य यांची उपस्थिती होती.

ज्ञानप्रकाश संगीत विद्यालयाने सर्वोत्कृष्ट समूहगीत तसेच एकल लोकवाद्य स्पर्धेत रुद्र राजापूरेच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. समूह नृत्य स्पर्धेत केशवराज रेनीन्सन स्कूलने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. उत्कृष्ट, उत्तम आणि प्रशंसनीय गटातील पारितोषिके नेटीझन्स स्कूल, विश्वेश्वरैय्या विद्यालय, लिटल फ्लावर स्कूल आणि वारकरी संस्कार धाम, निलंगा यांनी मिळवली.

समूह लोकगीत स्पर्धा :

सर्वोत्कृष्ट – ज्ञानप्रकाश संगीत विद्यालय

उत्कृष्ट – श्री श्री रविशंकर विद्यालय

उत्तम – नेटीझन्स इंग्लिश स्कूल

प्रशंसनीय – वारकरी संस्कार धाम, निलंगा आणि स्प्रिंगडेल पब्लिक स्कूल.

एकल लोकनृत्य स्पर्धा :

सर्वोत्कृष्ट – सायली तेलंगे

उत्कृष्ट – शौर्या गोडबोले

उत्तम – सक्षम कांबळे

प्रशंसनीय – श्रेया कसबे आणि रुद्राक्षी नितनवरे.

एकल लोकगीत गायन स्पर्धा :

सर्वोत्कृष्ट – अपूर्वा पाटील

उत्कृष्ट – अनन्या जगदाळे

उत्तम – सर्वज्ञ नागुरे

प्रशंसनीय – वेदांत बिराजदार आणि गार्गी जाधव.

एकल लोकवाद्य स्पर्धा :

सर्वोत्कृष्ट – रुद्र राजापूरे

उत्कृष्ट – ध्रुव सिरसाट

उत्तम – राजदीप पवार

प्रशंसनीय – सिमंत दडगे आणि प्रतीक जत्ते.

सर्व विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक, प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या महोत्सवामुळे बालकलाकारांना महाराष्ट्राच्या लोककलेच्या विविध पैलूंचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ मिळाले.

महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी बालरंगभूमी परिषद लातूर शाखेचे अध्यक्ष रणजित आचार्य, कार्याध्यक्ष तथा समिती प्रमुख मयुर राजापूरे, प्रमुख कार्यवाह नवलाजी जाधव, सहसमिती प्रमुख विशाल वाटवडे, उपाध्यक्षा हिरा वेदपाठक, सुवर्णा बुरांडे, कोषाध्यक्ष रवि अघाव, सहकार्यवाह रवीकिरण सावंत, बालाजी म्हेत्रे, वनिता गोजमगुंडे, तन्मय रोडगे, तेजश्री घवले, ऋतुराज सुरवसे, वसुधा पाटील, महेश बिडवे, सुमती सोमवंशी, सलीम पठाण, भीम दुनगावे, महेश पवार, प्रीती ठाकूर, आर्यन गिरवलकर, कृष्णा शिंदे, अभिजित भड आणि यशोदीप कांबळे यांनी परिश्रम घेतले.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts