Police Flash News

उदगीरमध्ये पावसासाठी विशेष सामूहिक दुआ; महिलांसाठी विशेष जलशाचे आयोजन

0
67
उदगीरमध्ये पावसासाठी विशेष सामूहिक दुआ; महिलांसाठी विशेष जलशाचे आयोजन

उदगीर (प्रतिनिधी) : मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पावसासाठी अल्लाहकडे विशेष सामूहिक दुआ करण्यात येणार आहे. या निमित्ताने परिवर्तन सीरत कमिटी, उदगीर यांच्या वतीने महिलांसाठी विशेष जलशाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा विशेष जलसा शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ठीक ३ वाजता, मुसा नगर येथील संजय गांधी उर्दू शाळा (नया शादी खाना), उदगीर येथे आयोजित करण्यात आला आहे.

जलशाचा मुख्य विषय ‘घराला जन्नत कसे बनवावे? सीरत-ए-नबी (स.अ.व.)च्या प्रकाशात’ असा असून, यावेळी हजरत मौलाना मुफ्ती हम्माद साहब कुरेशी, इमाम व खतीब, मस्जिद पैगंबरपुरा, उदगीर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून महिलांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच हजरत मौलाना एजाजुल हक साहब कुरैशी, इमाम, मस्जिद कुरैश हे पावसासाठी विशेष दुआ करणार आहेत.

मुलांच्या संस्कारांवर विशेष मार्गदर्शन

सध्याच्या बदलत्या सामाजिक वातावरणात मोबाईल, सोशल मीडिया, चुकीची संगत तसेच धार्मिक व नैतिक संस्कारांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे मुलांच्या जडणघडणीवर परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जलशात पालकांसाठी विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

यावेळी मुलांच्या चांगल्या संस्कारांसाठी पाच महत्त्वाचे मुद्दे सांगण्यात येणार आहेत. त्यामध्ये नमाजची पाबंदी, मोबाईलचा योग्य वापर, आईची कुशी हा पहिला मदरसा, चांगली व वाईट संगत ओळखणे आणि दररोज मुलांसोबत काही वेळ दीन व संस्कारांच्या गोष्टी करणे यांचा समावेश आहे.

महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

या विशेष जलशात शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन परिवर्तन सीरत कमिटीचे संस्थापक अध्यक्ष व संपादक अझहरोद्दीन शमशोद्दीन शेख, हाश्मी सय्यद शोएब अहमद, हाश्मी सय्यद अबूबकर, फारोखी रियाज, शेख रफिक, शेख रिहान रिजवान शेख

यांनी केले आहे.

महिलांसाठी स्वतंत्र पडदा व बसण्याची योग्य व्यवस्था करण्यात आली असून, उदगीर शहरातील तसेच परिसरातील नागरिकांनी आपल्या घरातील महिलांना या विशेष जलशात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts