Police Flash News

परप्रांतीय कामगाराला मारहाण; तक्रारदाराकडून ओळख पटवून चार आरोपी अटक

0
103
परप्रांतीय कामगाराला मारहाण; तक्रारदाराकडून ओळख पटवून चार आरोपी अटक

लातूर (एल पी उगीले) अतिरिक्त एमआयडीसी, हरंगुळ (बु.) परिसरातील अंधाऱ्या रस्त्यावर परप्रांतीय कामगारासह त्याच्या सहकाऱ्यांना कत्तीच्या उलट्या पात्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत चार आरोपींना अटक केली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६७०/२०२६, कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९०, १९१(२) भारतीय न्याय संहिता, २०२३ सह कलम ४, २५ भारतीय हत्यार अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी रामपती गुलाब सिंह (वय २५ वर्षे, रा. आग्रा, उत्तरप्रदेश) हे अतिरिक्त एमआयडीसी, लातूर येथील एका स्वीट अण्ड स्नॅक्स मिठाई कारखान्यात आचारी म्हणून काम करतात. दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ७ वाजता ते सहकाऱ्यांसह कारखान्यासमोरील किराणा दुकानाकडे गेले होते. परत येत असताना एका वाहनाजवळ थांबलेल्या इसमांनी त्यांना अडवून विनाकारण शिवीगाळ करून फिर्यादीच्या डाव्या मनगटावर कत्तीच्या उलट्या पात्याने मारहाण करण्यात आली.फिर्यादीस सोडविण्यासाठी आलेल्या विष्णू रणवीर सिंह यांनाही लाथाबुक्क्यांनी व कत्तीच्या उलट्या पात्याने मारहाण करण्यात आली. तसेच नवीनकुमार प्रीतम सिंह यांनाही मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.

गुन्ह्याचा तपास सुरू केल्यानंतर उपलब्ध माहिती, तपासातील निष्कर्ष व इतर बाबींच्या आधारे या घटनेत सहभागी असलेल्या चार आरोपींची ओळख निष्पन्न करण्यात आली. त्यानंतर फिर्यादीस पोलीस ठाण्यात बोलावून त्याच्याकडून आरोपींची पडताळणी करून जबाब नोंदविण्यात आला. फिर्यादीने पडताळणीदरम्यान आरोपींना ओळखले. तपासाअंती

रितेश नारायण कल्याणकर, (वय २३ वर्षे, रा. किनाळा, ता. भोकर, जि. नांदेड, ह.मु. हरंगुळ (बु.), ता. जि. लातूर), दत्ता गिरीश पवार, (वय २२ वर्षे, रा. हत्ते नगर, लातूर),प्रदीप अनंत गायकवाड, (वय २० वर्षे, रा. १२ नंबर, अतिरिक्त एमआयडीसी, लातूर), विश्वजीत बलभीम पांढरे, (रा. टाकळगाव, ता. रेणापूर, जि. लातूर, ह.मु. महादेव नगर, मांजरा गेट, लातूर)

पवन बालाजी जाधव, (रा. डोरनाळी, ता. मुखेड, जि. नांदेड, ह.मु. अतिरिक्त एमआयडीसी, हरंगुळ (बु.), ता. जि. लातूर.(फरार))चार आरोपींना दिनांक २ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ९.५४ वाजता अटक करण्यात आली असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश पोगुलवार करीत असून, पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे तपासी पथक कार्यरत आहे. तपास पथकात पोलीस अमलदार बळवंत भोसले, राजाभाऊ मस्के, अमित लहाणे, अक्षय डीगोळे, पद्माकर पांचाळ व विश्वनाथ डोंगरे यांचा सहभाग आहे.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts