महाराष्ट्र

बिटकॉइन न देता तरुणाची २० लाखांची फसवणूक

पुणे (प्रकाश इगवे) : दीड बिटकॉइनसाठी बँक खात्यात पैसे भरायला सांगून पैसे भरल्यानंतरही बिटकॉइन न देता १९ लाख ७० हजार...

चिखलीत गांजा विक्रीप्रकरणी तरुणाला अटक

पिंपरी (प्रकाश इगवे) : चिखली येथे गांजा विक्री प्रकरणी एकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून कारवाईत अर्धा किलो...

बदलीसाठी पोलिसांकडून पैसे उकळणारा जेरबंद

पिंपरी (रफिक शेख) : पोलीस आयुक्तालयातून पोलीस निरीक्षक बोलत असल्याचे सांगून बदलीसाठी पोलीस आयुक्तांच्या नावाखाली महिला हवालदाराकडून पैसे उकळणाऱ्याला एमआयडीसी...

पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नी, सासूचा ‘राडा’

बावधन येथे महिलेला जिवे मारण्याचा प्रयत्न पिंपरी (प्रकाश इगवे) : पोलीस उपनिरीक्षकाची पत्नी आणि सासूने राडा घालत महिलेला जिवे मारण्याचा...

जमीन खरेदीचे पैसे देण्याच्या बहाण्याने केले अपहरण

उत्तर प्रदेशात नेऊन मागितली १० लाखांची खंडणी पुणे : जागा खरेदीसाठी अगाऊ पैसे देऊन उरलेले पैसे देण्यासाठी केसनंदला बोलावून घेतले....

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पिंपरी (रफिक शेख) : अल्पवयीन मुलीला लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. अजंठानगर, निगडी येथे गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही...

अपहरण केलेल्या तरुणाची सुटका

पिंपरी(रफिक शेख) : मारहाण करून तरुणाचे अपहरण केले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सूत्रे हलवून अपहृताची सुटका केली. निगडी प्राधिकरण येथे...

महिला पोलिसासोबत गैरवर्तन मोशी येथील घटना; तिघांना अटक

पिंपरी (प्रकाश इगवे) : रिक्षा व्यवस्थित चालविण्यास सांगितल्याने महिला पोलिसासोबत गैरवर्तन केले. रिक्षात ओढून विनयभंग केला. याप्रकरणी रिक्षाचालकासह तिघांना अटक...

दहशतीसाठी लावला फ्लेक्स; दोघांवर गुन्हा

भोसरी येथील फ्लेक्स पोलिसांनी हटविला पिंपरी (प्रकाश इगवे) : महापालिका निवडणुकीनिमित्त शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे राजकीय पदाधिकाऱ्यांसह सराईत...

ट्रकच्या काचा फोडून चालकाला लुटले

पुणे (रफिक शेख) : ट्रकच्या काचा फोडून ट्रक चालकाकडील ७,५०० रुपयाचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. तसेच तलवार फिरवत दहशत निर्माण...

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!