तो दिसायचा साधा; निघाला सेक्स रॅकेटचा दलाल

तो दिसायचा साधा; निघाला सेक्स रॅकेटचा दलाल

पुणे (रफिक शेख) : एक छोटे हॉटेल तो चालवत असे. त्याचा वेश अगदी गबाळा होता. कधीही तो टापटीप कपडे घालत नसे. त्यामुळे कोणालाही त्याच्याविषयी संशयही येत नसे. त्यामुळे गेली चार वर्षे त्याचे काम बिनभोबाटा सुरू होते. पोलिसांना याची खबर लागली. त्यांनी त्याच्यावर नजर ठेवून त्याला जाळ्यात पकडले. तेव्हा गबाळा दिसणारा हा एक आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट चालवत असल्याचे आढळून आले. राहुल संन्यासी (वय ३०, रा. लोहगाव), असे या एजंटाचे नाव आहे. त्याच्या सोबत असलेल्या उझबेकिस्तान, नेपाळ, दिल्ली आणि मुंबई येथील चार महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल संन्यासी हा मूळचा आसाम येथे राहणारा आहे. तो पुण्यात गेल्या काही वर्षांपासून राहतो. चायनीजची गाडी, छोटे हॉटेल तो दाखवायला चालवत असे. त्याचा मूळ व्यवसाय वेश्या व्यवसायासाठी मुली पुरविणे हा होता. पोलीस अंमलदार सचिन जाधव यांना साकोरे नगर येथे एक जण खासगी वाहनातून काही मुलींना वेश्या व्यवसायाकरिता घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली बनावट ग्राहकाद्वारे त्याच्याशी संपर्क केला. साकोरे नगर येथे तो दोन रिक्षांमधून चार तरुणींना घेऊन आल्यावर पोलिसांनी त्याला छापा घालून पकडले.

About The Author

error: Content is protected !!