धक्कादायक; चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून

धक्कादायक; चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून

पुणे (प्रकाश इगवे) : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला मारहाण करून तिचा गळा दाबून खून केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती किशन ऊर्फ कृष्णाप्पा तुळप्पा चव्हाण (वय ४२, रा. लोणकर शाळेच्या मागे, वडगाव शेरी) याला अटक केली आहे. सीताम्मा किशन ऊर्फ कृष्णाप्पा चव्हाण (वय ३५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी जगन्नाथ होनबा राठोड (वय ४१, रा. मांजरी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशन चव्हाण हा पत्नी सीताम्मा हिच्यासोबत वडगाव शेरी येथील बाळासाहेब चांदेरे यांच्या मोकळ्या जागेतील प्लॉटमध्ये राहत होता. दोघेही मूळचे कर्नाटक येथील असून, बिगारी काम करतात. किशन पत्नी सीताम्मा हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता.

About The Author

error: Content is protected !!