दिलेले पैसे मागितले म्हणून आला राग; कोयत्याने केले वार

दिलेले पैसे मागितले म्हणून आला राग; कोयत्याने केले वार

पिंपरी (रफिक शेख) : उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून एकावर कोयत्याने वार केले. ‘माझ्या घरी पैसे मागायला परत यायचे नाही असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना आळंदी-मरकळ रस्त्यावर घडली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात अभिराज जोखुराम कोरी (वय २८, रा. हरगुडे वस्ती, चिखली) यांनी फिर्याद दिली. राजू पगारे, रतन ऊर्फ विकी काळे, कान्हा राजपूत, दया उर्फ दयाराम मारवाडी, नाथाराम चौधरी (वय ३९, रा. चाकण) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कोरी यांनी आरोपी राजपूत यांना दहा हजार रुपये उसने दिले होते. उसने पैसे परत मागण्यासाठी फिर्यादी आरोपी यांच्या घरी गेले होते. त्याचा राग येऊन आरोपी कान्हा राजपूत याने अभिराज कोरी यांना हाताने मारहाण केली. तसेच राजू पगारे, रतन उर्फ विक्की काळे यांनी फिर्यादीवर कोयत्याने वार केले. त्यानंतर बळजबरीने पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीत घालून मरकळ येथील दारूभट्टीवर घेऊन जाऊन परत मारहाण केली. माझ्या घरी परत पैसे मागायला यायचे नाही म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

About The Author

error: Content is protected !!