किरकोळ कारणावरून तुफान मारहाण

किरकोळ कारणावरून तुफान मारहाण

पिंपरी (प्रकाश इगवे) : थेरगाव येथील बारणे कॉर्नर येथे किरकोळ वादातून एकाला मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी दुपारी पावणेबारा वाजता घडली. याप्रकरणी भवानी पप्पुराम बंजारा (वय २१, तुळजाई कॉलनी, थेरगाव) यांनी फिर्याद दिली. रिहान पठाण, युनूस पठाण, बबलू पठाण, सनी चव्हाण, आकाश मैद (सर्व रा. थेरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, फिर्यादी भवानी बंजारा आणि आरोपी रिहान पठाण हे एकमेकांच्या शेजारील दुकानात कामाला आहेत. त्यांच्यामध्ये किरकोळ वाद झाले. त्या वादाचे रूपांतर भांडणाते झाले. आरोपी व साथीदारांनी मिळून भवानी बंजारा, जिंतेंद्र बंजारा, महिपाल बंजारा, बनवारी बंजारा यांना मारहाण केली.

About The Author

error: Content is protected !!