मारूती महाराज साखर कारखान्याचे काम पूर्णत्वाकडे
पालकमंत्री अमित देशमुख, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी दिलेला शब्द पाळला
औसा (प्रतिनिधी) : राज्यात नव्हे देशात साखर इंडस्ट्रीज मध्ये लातूरचा मांजरा साखर परिवाराचा नावलौकिक असून त्या परिवारातील मार्गदर्शक तथा माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री पालकमंत्री श्री अमित विलासराव देशमुख हे जेव्हा एखादा शब्द देतात तेव्हा ते करुण दाखवतात याचे उदाहरण म्हणजे औसा तालुक्यातील बेलकुंड येथील मारूती महाराज सहकारी साखर कारखाना गेली अनेक वर्षांपासून बंद असलेला हे शेतकऱ्यांचे मंदीर अखेर गतवर्षी झालेल्या निवडणुकीत मोठ्या विश्वासाने लोकांनी मांजरा परिवारा च्या जनमताचा कौल देवुन ताब्यात दिला निवडणुकी च्या फडात पालकमंत्री अमित देशमुख यांनी लोकांना शब्द दिला होता तूम्ही निवडूण द्या आम्ही साखर कारखाना सुरू करून पुन्हा शेतकऱ्यांचा मालकीचा करू असे ठोस आश्वासन दिले होते ते ठोस पाऊल लवकरच साखर कारखाना सुरु होण्याच्या मार्गावर वाटचाल करीत आहे आज तब्बल कारखाना स्थळी १३५ कामगार काम करित असून लवकरच हा साखर कारखान्यातून धूर निघेल अशी पावले पुढे पडत आहेत.
राज्यातील अनेक साखर कारखाने शेवटची घटका, बंद अवस्थेत बॅंकेच्या ताब्यात तर अनेक कारखाने मोडकळीस येवून मशिनरी धूळखात पडून राहिली आहे निवडणुका तोंडावर आल्या की पुढारी आश्वासन देतात पुढें काहीच होत नाही अशे मराठवाड्यात जवळपास १० ते १२ सहकारी साखर कारखाने बंद आवस्थेत आहेत कोणी पुढाकार घ्यावा असाही प्रश्न असतो स्थानिक पातळीवर अनेक विषय असतात कोणी राजकारण करत असतात कुणाला बँकेची आर्थिक मदत नसते अनेक अडचणी येतात त्यामूळे अनेक साखर कारखाने बंद अवस्थेत आहेत.
लातूरच्या मांजरा साखर परिवाराचे आधारस्तंभ सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, राज्याचे मंत्री अमित देशमुख यांनी गत वर्षी झालेल्या बेलकुंड येथील मारूती महाराज साखर कारखाना निवडणुकीत जो शब्द दिला होता तूम्ही निवडूण द्या आम्ही चालू करून देवू साखर कारखाना त्या दृष्टीने साखर कारखाना स्थळी कामगार अधिकारी कर्मचारी यांची लगभग सुरू आहे मशिनरी, इलेक्ट्रिकल, आई लिंग, नट बोल्ट, फिटिंग ची सर्व कामे जलदगतीने अंतिम टप्प्यात सुरू आहेत लवकरच हा साखर कारखाना सुरू होईल धुर निघालेला दिसेल शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा मंदीर परिसर खुला झालेला दिसेल.