दयानंद वाणिज्यच्या विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीमध्ये बँकेत वरिष्ठ अधिकारी पदावर निवड

दयानंद वाणिज्यच्या विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीमध्ये बँकेत वरिष्ठ अधिकारी पदावर निवड

दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलचे घवघवीत यश

लातूर (प्रतिनिधी) : येथील दयानंद वाणिज्य महाविद्यालयातील प्लेसमेंट सेल व एन.आय.आय.टी. यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच आय.सी.आय.सी.आय. बँकेत वरिष्ठ अधिकारी पदावर निवड करण्यासाठी कॅम्पस मुलाखती चे आयोजन करण्यात आले होते. सदरील कॅम्पस मुलाखतीमध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. यामध्ये मुलाखतीच्या तीन वेगवेगळ्या फेऱ्यामधून 15 विद्यार्थ्यांची आय.सी.आय.सी.आय. बँकेत वरिष्ठ अधिकारी पदावर निवड करण्यात आली. दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली प्लेसमेंट सेल ने यासाठी विशेष मेहनत घेतली.यावेळी भरती अधिकारी म्हणून अनुश्री जोशी यांनी काम पाहिले.

सदरील कॅम्पस मुलाखतीमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी, उपाध्यक्ष रमेश कुमारजी राठी, सचिव रमेशजी बियाणी, प्राचार्य डॉ. श्रीराम सोळंके, उपप्राचार्य डॉ. राजाराम पवार, बी.सी.ए. विभागप्रमुख प्रा.शशिकांत स्वामी, कार्यालयीन अधीक्षक श्री कातपुरे आदींची उपस्थिती होती. या कॅम्पस मुलाखती यशस्वी करण्यासाठी प्लेसमेंट सेलचे प्रभारी प्रा.दगडू शेख, डॉ. स्मिता भक्कड, प्रा.लहू शेंडगे, प्रा.कल्याणी पाटील, प्रा.क्यू.एन.शेख, प्रा.श्रावण बनसोडे, प्रा.सुधीर माने आदींनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author