शेतकर्याच्या प्रगतीतूनच राष्ट्राच्या प्रगतीचे स्वप्न साकार होईल – माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर (प्रतिनिधी) : भारतीय प्रजासत्ताकाने विविध क्षेत्रात चौफेर प्रगती केली असून सरंक्षण, शिक्षण, अर्थकारण यासंह देशाला जागतिक पातळीवर सर्वोच्य स्थान मिळवून देण्यासाठी व राष्ट्राच्या प्रगतीसाठी सर्वांनी निष्ठेने कार्य करावे, देशातील शेतकरी आणि कृषी क्षेत्र समृध्द आणि संपन्न व्हावे,यासाठी केंद्र सरकार सतत प्रयत्नशील आहे. त्यामुळे शेतकर्याच्या प्रगतीतूनच राष्ट्राच्या प्रगतीचे स्वप्न साकार होईल, असे प्रतिपादन जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी व्यक्त केले.
यावेळी ते जेएसपीएम संस्था संचलित मजगे नगर येथील महाराष्ट्र विद्यालयात 26 जानेवारी 2021 रोजी 71 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप पाटील रेणापूरकर, समन्वय संचालक निळकंठराव पवार, समन्वयक बापूसाहेब गोरे, प्राचार्य गोविंद शिंदे, मु.अ.संजय बिराजदार, सी.एस.एन.इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य अफरोज पठाण, के.एन.कदम, प्रा.महादेव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, कोरोणाच्या संकटातही कोरोणावर मात करीत ऑनलाईन शिक्षणपध्दतीचा अवलंब करून जेएसपीएम संस्थेच्या माध्यमातून गुणवत्तेची परंपरा कायम ठेवण्याचे काम करण्यात आले. केंद्र सरकारने देशातील शेतकर्यांसाठी तीन कृषी कायदे लोकसभा व राज्यसभेत प्रचंड मताधिक्याने मंजूर करून घेतले. व त्याला राष्ट्रपतीनेही मान्यता दिली. लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने कायदे करून शेतकर्याला आर्थिक सुबकता व स्थैर्य देण्याचा प्रयत्न पंतप्रधान ना.नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे. या कायद्याचे कौतुक आंतरराष्ट्रीय नाणे निधी (आय.एम.एफ) चे डायरेक्टर गेरी राईस यांनी केले असून या कायद्यामुळे शेतकरी थेट खरेदीदाराच्या संपर्कात येणार असल्यामुळे दलाली बंद होणार आहे. तसेच यामुळे शेतकर्याला आर्थिक फायदा होणार असल्याचे वक्तव्यही गेरी यांनी केले आहे. काँग्रेस सरकारच्या काळात पंतप्रधान पी.व्ही.नर्सिंगराव यांनी मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली. डॉ.मनमोहनसिंग यांनी मॉडेल अॅक्ट आणून खाजगी मार्केेट कमिट्या काढण्यास परवानगी दिली. फळे, भाजीपाला मुक्त केले. असे असतानाही शेतकरी हिताच्या बाबीला विरोध करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न काँगे्रेस नेते करीत आहेत. पंरतु शेतकरी व जनतेने या कायद्याला जाहीर पाठींबा दिला पाहिजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये आमुलाग्र बदल करण्यासाठी सी.बी.सी.एस.नवीन शिक्षणपद्धतीचा अंमल चालू केला, एन.आर.सी.कायदा लागू करून 370 कलम रद्द कले, कोरोणा महामारीचा सामना अत्यंत यशस्वीपणे केला. लस शोधून काढली. देशात व जगात त्याचे वाटपही चालु केले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगातील अनेक देश धन्यवाद देत आहेत, असे मतही माजी आ. कव्हेकर यांनी यावेळी बोलताना केले. प्रारंभी जेएसपीएम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विविध स्पर्धा परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त होत असलेल्या कमलाकर कदम व युध्दवीर पाटील या कर्मचार्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अब्दुल गालीब शेख यांनी केले तर आभार मु.अ.संजय बिराजदार यांनी मानले. यावेळी उपप्राचार्य विठ्ठल चेवले, उपमुख्याध्यापक अनिल सोमवंशी, उपमुख्याध्यापक तुकाराम येलाले यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी कारोणाच्या पार्श्वभूमिवर सोशल डिस्टसिंगचे पालन करून उपस्थित होते.