राजमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे 200 जणांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानीत

राजमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे 200 जणांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानीत

लातूर (प्रतिनिधी) : राजमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लातुरच्या वतीने राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा ’कोरोना योद्धा’ पुरस्कार देवून मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले.तसेच कोरोणा कालवधीतील रूग्णांची गरज लक्षात घेवून घेण्यात आलेल्या रक्‍तदान शिबीरात 151 जणांनी रक्‍तदान केले.

लॉकडाऊच्या काळात जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यावेळी संस्थेच्यावतीने रक्त पुरवठा केला गेला. संस्थेचे अध्यक्ष बालाजी जाधव, कोषाध्यक्ष विशाल देवकते, उपाध्यक्ष राम शिंदे, सचिव विवेश शिंदे, सहसचिव श्रीकांत फोलाने यांनी या संस्थेअंतर्गत ’रक्तदान हेच जीवन दान’ या वॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून गरजु पेशंटला तात्काळ रक्त पुरवण्याचे काम होत आहे. कोरोना महामारीच्या काळात आपल्या जीवाची काळजी न करता आपल्या जिल्हयातील डॉक्टर,नर्स पोलीस, पत्रकार,आशा वर्कर आशा कार्यकर्त्यांनी, महानगर पालिकेच्या स्वच्छता कामगार,(108) रूग्णवाहीका चालक, महानगरपलिकेचे अंत्यविधी करणारे कर्मचारी व सर्व लातूर शहरातील ब्लड बँकेेचे अधिकारी, कर्मचारी, अशा एकूण दोनशे कोरोना योद्धाना राजमाता बहुउद्देशिय सेवाभावी संस्थामार्फत कोरोना सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर, विलासराव देशमुख शासकीय विज्ञान व संशोधन संस्थेचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संतोषकुमार डोपे, नगरसेविका सपनाताई किसवे, सुरेशभाऊ कांबळे, कॉमेडी फेम बालाजी सुळ, संध्याताई जैन, अड.प्रमोद जाधव, दामिनी पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपाली गित्ते, डॉ. कांचनताई जाधव, डॉ.शिल्पाताई शिंदे, पत्रकार अजय घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी ’रक्तदान हेच जीवन दान ग्रुप’ चे अनवर सय्यद, तुकाराम दोडके, मल्हारी तनपुरे, वैभव कोर्दे, अमोल हैळकर, किशोर संवडकर, निसार सय्यद, महादेव चरके, समाधान पुडकर, प्रविन बुबणे, कृष्णा वाडेकर, प्रशांत शिंदे, सतिश बोडके, संजय कोळी, रघुनाथ कराड, अरमान शेख, कृष्णा जाधव, व्यंकट मुळगे, रोहित जाधव, शरद सावंत, प्रकाश खराडे, महेश बदामे, राहुल राजपुत यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रसाद मोठे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल देवकते यांनी केले तर आभार बालाजी जाधव यांनी मानले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!