स्वामी दयानंद विद्यालय कव्हा शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

स्वामी दयानंद विद्यालय कव्हा शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

लातूर (प्रतिनिधी) : जेएसपीएम लातूर द्वारा संचालित स्वामी दयानंद विद्यालय कव्हा शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कव्हा गावच्या माजी सरपंच श्रीमती ललिताबाई तानाजीराव पाटील कव्हेकर यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शालेय स्थानिक समितीचे अध्यक्ष अशोक पाटील, उपाध्यक्ष किशोर दादा घार तसेच शालेय समितीचे सदस्य नेताजी मस्के, शिवशरण थंबा, गोविंद सोदले, सदाशिव सारगे, नामदेव मोमले, नागेश जाधव, रसूल पठाण, गोपाळ सारगे, सूर्यकांत होळकर, नवनाथ साखरे, आकाश जाधव यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका कांदे अरुणा, उपमुख्याध्यापक देशमुख प्रकाश, मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहाचे अधीक्षक अमर पाटील, शिक्षक कदम सर, मानकरी सर, थंबा सर, अक्कलदिवे सर, मोकाशे सर, धामनगावे सर, मस्के मॅडम, घार सर, राम कौरे, राजाराम काळे व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!