नवनिर्वाचीत सदस्यांनी घेतली माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची भेट

सर्व नूतन सदस्यांना दिल्या शुभेच्छा
लातूर (प्रतिनिधी) : राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या आशियाना निवासस्थानी जिल्यातील जवळगा, खरोळा, खुलगापुर, चिखुरडा, चांभारगा, येथील नूतन ग्रामपंचायत सदस्यांनी भेट घेतली असता त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या असून नव्या वर्षात गावाच्या विकासासाठी सर्वानी प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी उपस्थित सदस्यांना केलें आहे.
यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, रेणा चे माजी चेअरमन आबासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाठ, विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, रेणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, जिल्हा काँग्रेस मिडिया अध्यक्ष हरीराम कुलकर्णी, माजी जिल्हा परिषद सदस्य ओमप्रकाश गोडभरले, नवनाथ भोसले,बाळासाहेब कदम, अजित बेळकोने, सुभाष घोडके, शिवराज सप्ताळ, आदी मान्यवर उपस्थित होते.