महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेसच्या प्रदेश सचिवपदी अ‍ॅड.सुुरज विभुते

महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेसच्या प्रदेश सचिवपदी अ‍ॅड.सुुरज विभुते

लातूर (प्रतिनिधी) : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेसच्या निवडणुकीत प्रदेश सचिवपदी अ‍ॅड.सुरज विभुते विजयी झालेले आहेत. अ‍ॅड.सुरज विभुते हे लातूर जिल्हा व सत्र न्यायालयात सध्या वकीली व्यवसाय करत असुन ते वयाच्या 18 व्या वर्षापासुन युवक कॉग्रेसमध्ये सक्रीय आहेत. त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याची सुरवात ही युवक कॉग्रेस चा मसला या गावच्या अध्यक्षपदापासुन झाली. गेली 10 वर्षापेक्षा जास्त कालावधीत देशभरात विविध राज्यामध्ये जावून कॉग्रेस पक्षाने दिलेल्या विविध जबाबदार्‍या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांना कसलाही राजकीय वारसा नसताना राहुलजी गांधी यांच्याा संकल्पनेमुळे त्यांना देशभरात काम करण्याची संधी मिळाली आहे. या निवडीबददल त्यांचे विविध स्तरातुन, नागरिकातुन अभिनंदन होत आहे.

About The Author

error: Content is protected !!