एच.ई. एस हायस्कूल येथे दहावीच्या परीक्षेला सुरुवात

एच.ई. एस हायस्कूल येथे दहावीच्या परीक्षेला सुरुवात

महागाव (प्रतिनिधी) : दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून तालुक्यातील हिवरा येथिल एच ई एस हायस्कूल येथील परीक्षा सुरू झाली असून येथे २१२ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावाने दोन वर्षे दहावीच्या परीक्षा दोन वर्षे होऊ शकली नसल्याने यंदा शासनाच्या वतीने निर्बंधा मध्ये शिथिलता येताच दहावी बारावीचे परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला असून दिनांक १५ मार्च पासून २०२२ या वर्षाच्या दहावीच्या ऑफलाइन परीक्षेला सुरुवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील हिवरा शिक्षण संस्था येथे दहावीच्या परीक्षेला कोरोनाचे नियम पाळून सुरुवात झाली असून यावेळी २१२ परीक्षार्थी परीक्षा देत असून यापैकी स्व.मारोतराव पाटील विद्यालय कवठा बाजार व गुरुदेव रवींद्रनाथ टागोर विद्यालय शेलू (अ) या शाळांना हिवरा केंद्राला जोडण्यात आले होते परंतु शासनाच्या नियमाप्रमाणे या दोन्ही शाळाना स्थानिक पातळीवरच उपकेंद्र देण्यात आले असून या उपकेंद्रावर अनुक्रमे ४० व२३ एकूण ६३ विद्यार्थी सुद्धा परीक्षा देत असल्याची माहिती परीक्षा केंद्र संचालक मनोहर करपुडे यांनी दिली आहे. सदर दहावीची परीक्षा दिनांक १५ मार्च ते ०४ एप्रिल पर्यंत पार पडणार आहे.

About The Author