चोर सोडून सन्याशाला फाशी; राज्यशासनाचा जाहीर निषेध
लातूर (प्रतिनिधी) : भाजपाचे नेते विधानसभेतील विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना दिलेल्या बेकायदेशीर नोटिशीची होळी करून ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड आणि शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महाविकास आघाडी शासनाचा लातूर जिल्हा भाजपाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी भाजपाचे लोकप्रतिनीधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येनी उपस्थित होते.
बनावट पुराव्याच्या आधारे विरोधी पक्षाच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडविण्याचे कारस्थान करण्यात येत आहे भाजपाचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांना बेकायदेशीर पद्धतीने बजावलेल्या नोटिशीचा निषेधार्थ लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जिल्हा भाजपाच्या वतीने राज्यातील तिघाडी आघाडी शासनाचा जाहीर निषेध करून फडणवीस यांना देण्यात आलेल्या नोटिशीची होळी करण्यात आली. यावेळी देवेंद्र भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, देवेंद्र भाऊ तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, भाजपाचा विजय असो, भारत माता की जय, आघाडी सरकारचा करायचं काय खाली मुंडकं वर पाय यासह विविध गगनभेदी घोषणांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता.
यावेळी पत्रकारांशी बोलताना आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी नव्हे तर महावसुली करणारे सरकार सत्तेवर बसले आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी सरकारमधील मत्र्यांच्या भ्रष्ट कारभाराचे अनेक प्रकरणे उघडकीस आणली आहेत. त्यामुळे कांही मंत्री जेलमध्ये गेले तर कांहीजण येत्या काळात गेल्याशिवाय राहणार नाहीत. ही परिस्थिती निर्माण झाल्याने विरोधी पक्षांच्या नेत्यांना बनावट पुराव्याच्या आधारे खोटया गुन्हयामध्ये अडकविण्याचे सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने कट कारस्थाने सुरू केली आहेत. भ्रष्टाचार करणाऱ्यांना सोडून भ्रष्टाचार उघड करणाऱ्यावरच कार्यवाही केली जाते हे दुर्देवी असून चोर सोडून सन्यांशाला फाशी अशा परिस्थितीचे राजकारण राज्यात सूरू झाले आहे. लातूर जिल्हयासह संपूर्ण महाराष्ट्रातील भाजपा देवेंद्रभाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजीत हो नही सकता असे बोलून दाखविले.
जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड आणि गुरुनाथ मगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्ह्याचे खासदार सुधाकर शृंगारे, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, युवा मोर्चा प्रदेश प्रवक्त्या प्रेरणा होनराव, जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, विक्रम शिंदे, शहर सरचिटणीस मनीष बंडेवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, सभापती रोहिदास वाघमारे, बापूराव राठोड, डॉ बाबासाहेब घुले, प्रदीप मोरे, शैलेश स्वामी, संगीत रंदाळे, भागवत सोट, पंडितराव सूर्यवंशी, अनिल भिसे, गोविंद नरहरे, हनुमंतबापू नागटिळक, अरविंद नागरगोजे, बसवराज रोडगे, सुभाष जाधव, हनुमंत देवकते, शिवाजी बैनगिरे, शाहूराज थेटे, ज्ञानेश्वर वाकडे, बालाजी केंद्रे, अनंत गायकवाड, देवा साळुंके, ज्ञानेश्वर चेवले, साहेबराव मुळे, बालाजी पाटील, संतोष वाघमारे, महेश पाटील, सुरेंद्र गोडभरले, बायनाबाई साळवे, अनिल पतंगे, शिवसिंह सिसोदिया, ललित तोष्णीवाल, मुन्ना हाश्मी, सतीश ठाकूर, किशोर जैन, गोरोबा गाडेकर, रवी सुडे, अमोल गीते, तुकाराम मद्दे, तानाजी बिराजदार, काशिनाथ ढगे, रंजीत मिरकले, वसंत करमुंडे, शरद दरेकर, भैरवनाथ पिसाळ, शाम वाघमारे, मनोज पुदाले, बबलू पठाण, विश्वनाथ चाटे, रामदास खंदारे, राजकुमार राजारूपे, गणेश हाके, अनिल कबाडे, संजय गिरी, अजय भूमकर, श्रीमंत नागरगोजे, चंद्रकांत वागस्कर, गोपाळ पवार, श्रीकृष्ण मोटेगावकर, समाधान कदम, विनायक मगर, शंकर चव्हाण, मुन्ना गुर्ले, गोपाळ शेंडगे, अभिजीत मद्दे, श्रीकृष्ण पवार, मनोज बिराजदार, गणेश गायकवाड, सुनील पाटील यांच्यासह जिल्हाभरातील भाजपाचे लोकप्रतिनिधी, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.