तलाक; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीला तोंडी तलाक
पतीवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा
पिंपरी (रफिक शेख) : सॉफ्टवेअर इंजिनिअर फिर्यादी त्यांच्या तीन वर्षीय विवाहितेला पतीने तीन वेळा तलाक दिला. विवाहितेने या प्रकरणी पोलिसांकडे धाव घेतली. मुस्लिम महिला (विवाहाच्या अधिकाराचे संरक्षण) कायदा, २०१९च्या कलम ४ अन्वये याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत म्हाळुंगे येथे १७ जुलै २०२१ ते १२ मार्च २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला. १७ जुलै २०२१ रोजी रुकसार फैजान जमादार (वय २८, रा. म्हाळुंगे, पुणे) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. १२) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फैजान जावेद जमादार (वय ३०, रा. फुलेनगर, येरवडा, पुणे) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला रुकसार जमादार या सॉफ्टवेअर इंजिनयर आहेत. फिर्यादी महिला आणि फैजान जमादार यांचे २४ डिसेंबर २०१७ रोजी मुस्लिम
मुलासह सासरी गेल्या होत्या. त्या वेळी फिर्यादी विवाहितेला घरात घेतले नाही. तसेच पती फैजान हा तीन वेळा तलाक म्हणाला. आता तुझा व माझा तलाक झाला आहे, आता तुझा व माझा संबंध संपला, असे पती फैजान म्हणाला, हा तलाक मान्य नाही, असे फिर्यादीने सांगितले. मी तुला कायदेशीर नोटीस पाठवितो, असे पती फैजान म्हणाला. त्यानंतर त्याने फिर्यादी विवाहितेला तीन वेळा नोटीस पाठविली. त्यात तलाक असा उल्लेख केला. तलाक मान्य नसून मला नांदायचे आहे असे फिर्यादीने नोटिसीला उत्तर दिले. दुसरे लग्न करणार आहे असेही फैजानने नोटिसीतून सांगितले असे फिर्यादीत नमूद आहे. रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले. त्यानंतर फिर्यादी विवाहितेचा पती फैजान जमादार, सासू, नणंद व काका हे मानसिक करीत होते.