माजी खासदाराच्या घरी चोरी; ७२ लाख ९३ हजार चोरीला

माजी खासदाराच्या घरी चोरी; ७२ लाख ९३ हजार चोरीला

पुणे (रफिक शेख) : माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे बंधू श्रीधर कलमाडी यांच्या बाणेर येथील घराच्या खिडकीची जाळी तोडून चोरट्यांनी ७२ लाख ९३ हजार ७७७ रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. त्यात हिरे, मोतीजडीत किमती दागिने व रोख रकमेचा समावेश आहे. याप्रकरणी श्रीधर श्यामराव कलमाड़ी (७४, रा. बाणेर) यांनी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना बाणेर रोडवरील शामलाली येथे रविवारी सायंकाळी सहा ते रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीधर कलमाडी हे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे बंधू असून, त्यांचे साई सर्व्हिस नावाने गाडी विक्रीचे शोरूम आहे. तसेच इतरही व्यवसाय आहेत. रविवारी सायंकाळी ते व त्यांच्या पत्नी घर बंद करून त्यांच्या नातेवाइकांकडे जेवणासाठी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी घराच्या खिडकीची जाळी फाडून त्यातून हात घालून दरवाजाची कडी काढली. त्यानंतर खिडकीतून घरात प्रवेश करून बेडरूमधील कपाटात ठेवलेली ५० हजारांची रोकड व हिरे, मोती जडीत दागिने असा ७२ लाख ९३ हजारांचा ऐवज चोरी केला.

About The Author

error: Content is protected !!