फायनान्स कार्यालय फोडून व्यावसायिकाला लुटले

दरोडा प्रकरणी आठ जणांवर गुन्हा

पिंपरी (प्रकाश इगवे) : कोयता, दांडके व दगड मारून फायनान्सच्या कार्यालयाचे नुकसान केले. त्याचा जाब विचारला असता व्यावसायिकाला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील रोकड काढून घेतली. पोलिसांनी आठ जणांच्या विरोधात दरोडा प्रकरणी गुन्हा दाखल केला. पिंपरीतील रिव्हर रोड येथील प्रमोद दत्तात्रय साबळे (वय ३१, रा. ड, बौद्धनगर कमानीजवळ पीएस फायनान्स कार्यालय येथे रविवारी (दि. १३) सायंकाळी साडेपाच ते सहा या कालावधीत ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील रिव्हर रोड येथे बौद्धनगर कमानीजवळ फिर्यादीच्या पीएस फायनान्सचे कार्यालय आहे. आरोपींनी या कार्यालयाच्या काचेवर, शटरवर लोखंडी कोयते, लाकडी दांडके व दगड मारून तोडफोड करीत होते. त्यामुळे फिर्यादी त्यांच्या कार्यालयाजवळ गेले. ऑफिसचे नुकसान का करीत आहात, असे फिर्यादीने आरोपींना विचारले. तू लोकांना व्याजाने पैसे देतो चांगले पैसे कमावतो, तुला जर येथे धंदा करायचा असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील, असे आरोपी चंदनशिवे म्हणाला. कसले पैसे, असे फिर्यादीने विचारले. याच्या खिशात असतील तेवढे पैसे काढून घ्या असे म्हणून फिरवत आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीच्या खिशातील अकराशे रुपयांची रोख रक्कम काढून घेतली.. कोयत्याचा धाक दाखवून आरोपींनी पुन्हा शिवीगाळ केली. पोलिसांत तक्रार केली तर बघ, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी कोयते, दांडके हवेल तसेच रस्त्यावरील हातगाड्यांवर मारत निघून गेले.

About The Author