राज्यमंत्री ना.संजय बनसोडे हे विश्र्वासघातकी – निवृत्ती सांगवे (सोनकांबळे)

राज्यमंत्री ना.संजय बनसोडे हे विश्र्वासघातकी - निवृत्ती सांगवे (सोनकांबळे)

उदगीर (प्रतिनिधी) उदगीरचे आमदार तथा राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांनी आघाडीचा धर्म ही पाळला नाही, आणि एमआयएमचे नगरसेवक राष्ट्रवादी घेऊन एम आय एम, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय दलित अधिकार मंच या मित्रपक्षांना धोका दिला असल्याचा आरोप राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांनी केला आहे. उदगीर येथील दिल्ली दरबार हॉटेलच्या सभाग्रहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. याप्रसंगी एम आय एम चे तालुकाध्यक्ष मुक्रम जागीरदार, शहराध्यक्ष शेख आखील मिया, राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या महिला आघाडीच्या प्रदेश प्रमुख सुस्मिता माने, शेख बबन भाई ,मुल्ला मेहबूब, असद जमाल सिद्दिकी, राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या ज्योती बालाजी डोंगरे, ज्येष्ठ विधिज्ञ रुक्मिणीबाई सोनकांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना निवृत्तीराव सांगवे यांनी सांगितले की, संजय बनसोडे यांनी लोकांची फसवणूक केली आहे. तसेच विकास कामे केल्याचे श्रेय घेत असताना कित्येक कामे नगरपालिकेच्या सभागृहाने मंजूर करून आणलेली कामे, मी केली. म्हणून श्रेय घेतलेले आहे. हे अत्यंत लबाडपणाचे लक्षण आहे. तसेच त्यांच्यामुळे उदगीर विधानसभा मतदार संघात जातीजातीमध्ये तेढ वाढलेली असून कार्यकर्त्यांची गुंडगिरी वाढल्याचा ही आरोप त्यांनी केला आहे. सामान्य माणसाचा विकास करण्यापेक्षा ठराविक लोकांना मदत करून अवैध धंद्यांना गती दिली आहे. असाही आरोप त्यांनी केला.
त्यामुळे त्यांना मंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांना एक निवेदन देऊन त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे. अशी मागणी केली आहे. 11 एप्रिल पर्यंत जर या मागणीचा विचार नाही झाला तर राष्ट्रीय दलित अधिकार मंच, समाजवादी पार्टी आणि एम आय एम यांच्या वतीने बारामती येथे निदर्शने व धरणे आंदोलन केले जाईल. असा इशाराही त्यांनी दिला आहे.

ग्रामीण भागातील जातीय वादाचे अनेक गुन्हे नोंद करण्यामध्ये राज्य मंत्र्यांचा हात असून भ्रष्ट मार्गाचा वापर सर्रास केला जात असल्याचाही आरोप सोनकांबळे यांनी केला आहे. बनसोडे निवडून यावेत म्हणून एम आय एम, राष्ट्रीय दलित अधिकार मंच आणि समाजवादी पक्षाने स्वतंत्र उमेदवार दिला नव्हता. बनसोडे यांनाच पाठिंबा देऊन विजयी केले. मात्र विजय झाल्यानंतर त्यांनी आपल्याला मदत करणाऱ्या पक्षांना संपविण्याचे धोरण स्वीकारले आहे. हे अत्यंत चुकीचे आहे.
साहित्य संमेलनासाठी ही वेळ योग्य नसतानाही चुकीच्या पद्धतीने साहित्य संमेलन घेतले जात असून निधी गोळा करत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. पदाचा गैरवापर करणाऱ्या मंत्र्यांची हकालपट्टी करावी अशी आग्रही मागणी सदरील निवेदनात त्यांनी केली आहे. तसेच नगरपालिकेच्या साठी आलेला दलित वस्ती सुधार योजनेचा निधी नगरपालिकेला न देता गुत्तेदार सांभाळण्यासाठी व पोसण्यासाठी बांधकाम खात्याकडे वळती केल्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम होईल, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे.

About The Author

error: Content is protected !!