तरुणाला कर्ज देण्याच्या नावाखाली तब्बल ६ लाख ३७ हजारांचा गंडा

तरुणाला कर्ज देण्याच्या नावाखाली तब्बल ६ लाख ३७ हजारांचा गंडा

पुणे ( प्रकाश इगवे) : फायनान्स कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करून सायबर चोरट्याने तरुणाला कर्ज देण्याच्या नावाखाली तब्बल ६ लाख ३७ हजारांचा गंडा घातला. ही घटना मार्च ते डिसेंबर २०२० या कालावधीत राजेंद्रनगरमध्ये घडली.याप्रकरणी राजेंद्रनगर येथे राहणाऱ्या एका ३८ वर्षांच्या तरुणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल खासगी कंपनीत कामाला असून, कुटुंबीयांसह राजेंद्रन गरमध्ये राहायला आहेत. १२ मार्च २०२० ला सायबर चोरट्याने त्यांना फोन करून फायनान्स कंपनीतून बोलत असल्याची बतावणी केली.कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवून संबंधिताने विशाल यांचा विश्वास संपादित केला.

About The Author

error: Content is protected !!