अल्पवयीन मुलीला प्रियकरानेच लुबाडले

पुणे (रफिक शेख) : अल्पवयीन मुलीसोबत जवळीक साधून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर आपल्या रिलेशनची माहिती घरी सांगेल, अशी भीती दाखवून तिच्या प्रेमीने ब्लॅकमेल करून लुबाडले. त्याच्या मैत्रीची माहिती मिळाल्यावर आणखी एका तरुणाने हे तुमचे रिलेशन तुझ्या आईवडिलांना सांगण्याची धमकी देऊन या मुलीला त्यानेही लुबाडल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी ऋतीक अशोक दिघे (वय १९, रा. दत्तनगर, कात्रज) याला अटक केली आहे. सार्थक नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आनंदनगर येथे राहणाऱ्या एका १७ वर्षांच्या मुलीच्या आईने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार जून २०१९ पासून आतापर्यंत सुरू होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदनगर येथील एका १७ वर्षांच्या मुलीसोबत ऋतीक दिघे याने जवळीक साधून मैत्री केली. त्या दोघांचे रिलेशन घरी सांगेल, अशी धमकी देऊन तिच्याकडे तो वेळोवेळी पैसे मागू लागला. तिच्याकडून त्याने आतापर्यंत ७ हजार ५०० रुपये लुबाडले. त्यानंतर त्याने डिसेंबर २०२१ मध्ये तिला खडकवासला येथे घेऊन गेला. तेथे तिचा विनयभंग केला. या दोघांच्या रिलेशनची माहिती सार्थक याला मिळाली. तेव्हा त्याने या मुलीला तू रिलेशनमध्ये ये, नाही तर ऋतीक व तुझे संबंधाबाबत तुझ्या आईवडिलांना सांगेन, अशी धमकी दिली. तिच्याकडे पैशाची मागणी करून ५०० रुपये घेतले. मुलीला वारंवार अधिक पैशाची गरज का भासते, याची चौकशी केल्यावर या मुलीने आपल्या आईला हा सर्व प्रकार सांगितला.

About The Author

error: Content is protected !!