अहमदपूर तालुक्यात दहावी बोर्ड परीक्षा सुरळीतपणे सुरु – बबनराव ढोकाडे

अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा सुरू झाले आहेत. कोरोनाच्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर तासभर आधी उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली आहे.अहमदपूर परिसरात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० बोर्ड परीक्षा )केंद्रावर सुरळीतपणे परीक्षा सुरू झाले आहेत. परिरक्षक कार्यालय, गट साधन केंद्र अंतर्गत तालुक्यातील परीक्षा केंद्रावर परिरक्षक कार्यालयांतर्गत २४३९ विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहे. यामध्ये मराठी माध्यमाचे २२५६ विद्यार्थी तर उर्दू माध्यमाचे १८३ विद्यार्थी परीक्षा देत आहेत.सदरील परीक्षा यशवंत विद्यालय अहमदपूर,महात्मा फुले विद्यालय, रवींद्रनाथ टागोर विद्यालय, विमलाबाई देशमुख कन्या शाळा, जि.प.प्रशाला अहमदपूर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालय सांगवी, परशुराम विद्यालय मोघा माध्यमिक आश्रम शाळा ढाळेगाव, जि.प.प्रशाला काजळ हिप्परगा या ९ मुख्य केंद्रावरुन २९ उपकेंद्रावर परीक्षा सुरळीत चालू आहे. परिराक्षक क्र.(१३८) अहमदपूर येथिल मुख्य परिरक्षक गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, उप.परिरक्षक रमाकांत बिलापट्टे, सह सहाय्यक परिरक्षक म्हणून रमेश चेपुरे, महादेव खळुरे, सुधिर भोसले,तानाजी केंद्रे, विवेक केंद्रे,कृष्णा मुंढे,आशोक थोरात, नंदकुमार कंजे, चंद्रकांत शेळके, मुक्तार सय्यद, लिपिक अहमद सिद्दीकी,UID लावणार सय्यद इकबाल अहेमद, सेवक एम.एम.पठाण हे एकूण ९ मुख्य केंद्र व २९ उप केंद्राचे काम पहात आहेत.परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथक आणि महिलांचे विशेष पथक परीक्षा केंद्रावर तैनात केले आहे.विशेष महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी वाढीव वेळ देण्यात आला आहे. ७० ते १०० गुणांच्या पेपरला ३० मिनिटे वाढीव वेळ, तर ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटे वाढीव वेळ देण्यात आला आहे.यामुळे भयमुक्त व तणावमुक्त वातावरणात विद्यार्थी परीक्षा देत आहेत.

About The Author

error: Content is protected !!