केंद्रेवाडीच्या शेतकऱ्याने माळरानावर फुलवली केळीची बाग
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील आदर्श गाव असलेले मौजे केंद्रेवाडी येथील श्री शिवहार नरबा केंद्रे यांनी आपल्या शेतात पाण्याचे सिंचनाचे योग्य नियोजन करून 20 गुंठ्यात केळीची लागवड केली आहे वर्षाकाठी 20 गुंठ्यात दोन लाख उत्पन्नाची त्यांना अपेक्षा आहे असे त्यांनी बोलताना सांगितले केंद्रे केंद्रेवाडीतील शेतकरी श्री शिवहार नरबा केंद्रे व त्यांच्या पत्नी सौ चंद्रकलाबाई शिवहार केंद्रे यांनी मुलांच्या व मुलींच्या शिक्षणासाठी 4 एकर शेती विकली आहे त्यानंतर त्यांनी गावात पर गावात जाऊन रोजंदारी करून आपल्या मुलांना शिक्षण दिले त्यातील मोठा मुलगा श्री माधव शिवहार केंद्रे हे आदर्श शिक्षक म्हणून पंचक्रोशीत सर्वत्र परिचित आहेत माधव केंद्रे हे उन्हाळी सुट्ट्या म्हणजेच मे महिन्याचा पगार दिवाळी सुट्ट्या चा पगार न घेता ते गोरगरीब समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना दान करतात ते एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून सुद्धा परिचित आहेत ते पाहणारे डोळे मदत करणारे हात या उपक्रमांतर्गत गोरगरीब दीनदलित वंचित विद्यार्थ्यांना मदत करत असतात त्यांचे हे सामाजिक कार्य पाहून सबंध महाराष्ट्रात दानशूर व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असणारे जि.प. सदस्य श्री अशोक काका केंद्रे व मा . सभापती सौ . अयोध्याताई अशोकराव केंद्रे या दांपत्याने व गावकरी मंडळी यांनी माधव केंद्रे यांच्या पत्नी सौ ज्योती माधव केंद्रे यांना बिनविरोध गावचे सरपंच केले आहे तर दुसरा मुलगा श्री नागनाथ शिवहार केंद्रे हा एका शाळेचा मुख्याध्यापक आहे नागनाथ केंद्रे हे सुद्धा आपल्या भावाच्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून समाजसेवेत सक्रीय आहेत चार मुली असा मोठा परिवार आहे श्री शिवहार केंद्रे यांनी शेततळे विहीर बोर यांच्या मदतीने पाण्याचा साठा करून पाण्याचे योग्य नियोजन करून ही वीस गुंठ्यात बाग लावली आहे याकामी मजूर न लावता त्यांचा पूर्ण परिवार सुनासह सर्वजण स्वतः कामे करतात आता केळीची पीक काढणी आलेली आहे हा एक आदर्श घेण्यासारखा परिवार आहे सर्व एकत्र गुण्यागोविंदाने नांदतात संबंध केंद्रेवाडी मध्ये माधव केंद्रे व नागनाथ केंद्रे यांना लोक राम लक्ष्मण या नावाने ओळखतात अशा या शेतकऱ्याने कष्टातून बाग फुलवले आहे.
