दाक्षायणी व रूद्र महिला मंडळाच्या वतीने महिला दिन साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील दाक्षायणी व रूद्र महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमा पूजन, दीपप्रज्वलन व प्रा.वर्षा पाटील यांच्या स्वागत गीताने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुद्र महिला मंडळाच्या अध्यक्षा विजयाताई चवंडा, प्रमुख वक्त्या म्हणून सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या रूथ चक्रनारायण प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा अश्विनीताई कासनाळे,इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.वर्षा भोसले, लीनेस क्लबच्या अध्यक्षा मीना तोवर, विजय स्वामी, शिवानी चवंडा सह मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात सीता कुदळे, शांताबाई गिराम, स्वप्ना भालके,माहेश्वरी शेटकर,आशा शेटकर, महानंदा भालके, उमा शेटकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख मार्गदर्शिका प्राचार्या रुथ चक्रनारायण यांनी भ्रूणहत्येवरील स्वरचित कविता सादर करून आईच्या गर्भातही मुलगी सुरक्षित नसल्याची खंत व्यक्त केली. नगराध्यक्षा अश्विनीताई कासनाळे यांनी मुलगा मुलगी असा भेदभाव न करता त्यांच्यावर चांगले संस्कार करावे.त्यांना चांगले शिक्षण द्यावे असे जाहीर आवाहन केले. यानंतर डॉ.वर्षा भोसले मीना तोवर, विजया स्वामी यांनी मनोगत पर भाषणे केली. अध्यक्षीय समारोप प्रसंगी विजय चवंडा यांनी चांगल्या प्रथांची, कामाची सुरवात प्रत्येकांनी स्वतःपासून करावी असा मोलाचा संदेश दिला. याप्रसंगी मंडळातील सदस्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. दाक्षायणी महिला मंडळाच्या सदस्यांनी महिला सबलीकरण व भ्रूणहत्या याविषयी नाटिका सादर केली. त्यात प्रमुख भूमिका रजनी महाजन, मनीषा मिरकले, वर्षा पाटील, प्रतिभा नीला, माहेश्वरी शेटकर, संगीता मिरकले, जया शिवपुजे,स्वाती शेटकर,पल्लवी हिंगणे,उमा शेटकर, शांता कासनाळे यांनी छान अभिनय केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दाक्षायणी महिला मंडळाच्या अध्यक्षा शिवानी चवंडा यांनी केले. सूत्रसंचालन कलावती भातांब्रे यांनी केले तर आभार आशा तत्तापुरे-रोडगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजया हामणे, प्रेमा वतनी, शोभा शेटकर, रमा शेटकर, सुजाता शिवपुजे सुषमा हामणे,विजया भुसारे, सुजाता गिराम,संगीता मेनकुदळे, सह सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
