बालाघाट औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे घवघवीत यश

बालाघाट औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे घवघवीत यश

अहमदपूर (गोविंद काळे) :बालाघाट औद्योगिक प्रशिक्षण संस्था रुद्धा ता. अहमदपूर येथील मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या वार्षिक परीक्षेचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये बालाघाट औ.प्र.संस्थेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये नागेश तुपकर 77. 57% गुण घेऊन प्रथम, पांडुरंग खटके 76.42% द्वितीय व अमित राठोड 76.14% गुण घेऊन तृतीय क्रमांकावर उत्तीर्ण झाले आहेत. तसेच विशेष प्रावीण्यासह एकूण चार विद्यार्थी व प्रथम श्रेणीत एकूण 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाविद्यालयाचा निकाल हा 90 % लागला असून या यशाबद्दल उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ते भाजपा गणेश हाके, संस्था सचिव रेखाताई तरडे, संचालक अमरदीप हाके, प्राचार्य मदन आरदवाड व सर्व निदेशक यांनी तोंडभरून कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.संस्था अध्यक्ष गणेश हाके यांनी सर्व प्राध्यापक व कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

About The Author

error: Content is protected !!