बालाघाट एज्युकेशन कॅम्पस येथे कै.अशोकराव हाके पाटील यांची जयंती साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील बालाघाट तंत्रनिकेतन तसेच सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचे तत्कालीन सचिव कै.अशोकराव हाके पाटील यांच्या जयंतीनिमित्त संचालक कुलदीप हाके यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी संचालिका शिवालिकाताई हाके, प्राचार्य फ्रुट चक्रनारायण, मलकानी निजमुद्दिन, संतोष लातूरे, श्रीराम कागणे, भिसे, लवटे, सतिष केंद्रे ,संतोष होनमाने महाविद्यालयातील सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित राहून अभिवादन केले.
