आशा भराडियाचे यश
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयची माजी आदर्श विद्यार्थिनी आशा गोपीकिशन भराडिया राठी यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या वतीने घेण्यात आलेल्या तत्त्वज्ञान विषयाच्या पीएच.डी कोर्स वर्क परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, आशा गोपीकिशन भराडिया राठी या तत्वज्ञान विषयांमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे तर लातूर येथील दयानंद कला महाविद्यालयातील तत्वज्ञान विषयात पीएच.डी. करीत असून विद्यापीठाने घेतलेल्या पीएच.डी. कोर्स वर्क परीक्षेत यांनी६७.४२ टक्के गुण संपादन करून प्राप्त केले आहेत. याबद्दल महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील उपप्राचार्य दुर्गादास चौधरी प्रो. डॉ. अनिल मुंढे, डॉ. सतीश ससाने, डॉ. पांडुरंग चिलगर यांनी तसेच आशा भराडिया यांचे वडील गोपीकिशन भराडिया, आई पुष्पा भराडिया, पती प्रकाश राठी यांनी तसेच मित्र परिवारांनी त्यांचे अभिनंदन करून पुढिल शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
