महात्मा फुले महाविद्यालयातील मराठी विभागाकडून आंतरराष्ट्रीय आज चर्चासत्र

महात्मा फुले महाविद्यालयातील मराठी विभागाकडून आंतरराष्ट्रीय आज चर्चासत्र

अहमदपूर (गोविंद काळे) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि मराठी विभाग, महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.‌२३ मार्च २०२२ रोजी ‘ जागतिक स्त्रीवाद आणि मराठी साहित्य ‘ या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, सुप्रसिद्ध समीक्षक, लेखक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुगल मीटवर होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय ऑनलाइन चर्चासत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री. ज्ञानदेव झोडगे गुरुजी उपस्थित राहणार असून, केंटकी राज्य, अमेरिका येथील मराठी लेखिका व विचारवंत डॉ. संगीता तोडमल या उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. चर्चा सत्रातील पहिल्या सत्रात पणजीम् गोवा येथील ज्येष्ठ संशोधक, समीक्षक डॉ.‌ स्नेहा सुवास प्रभू महांबरे यांचे बीज भाषण होणार आहे.‌ तर शोध निबंध वाचन सत्राचे अध्यक्षस्थान संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथील मराठी विभाग प्रमुख सुप्रसिद्ध लेखिका, संशोधक व विचारवंत डॉ. मोना चिमोटे या भूषविणार असून कॅलिफोर्निया, अमेरिका येथील अनुजा पाटील, इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालय, अमरावती येथील डॉ.‌मंदाकिनी मेश्राम, बेंगळुरू येथील कीर्ती गोयल आणि हिंगोली येथील शेख शफी बोल्डेकर आदी मान्यवर शोध निबंधांचे वाचन करणार आहेत.‌

या आंतरराष्ट्रीय ऑनलाइन चर्चासत्रात जागतिक स्तरावरील स्त्रीवाद आणि मराठी साहित्यासंदर्भात महत्त्वपूर्ण मांडणी होणार असून, अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी ‌व प्राध्यापक, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार आणि चर्चा सत्राचे संयोजक डॉ. अनिल मुंढे व‌ डॉ. मारोती कसाब यांनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!