बीडच्या जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या पुरस्काराचे पहिले मानकरी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार

बीडच्या जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या पुरस्काराचे पहिले मानकरी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार

परिषदेचा ‘जगद्गुरू तुकोबाराय साहित्य रत्न’ पुरस्कार जाहीर

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी साहित्य व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मराठा सेवा संघ प्रणित ‘जगदगुरू तुकोबाराय साहित्य परिषद’ बीड चा पहिला ‘जगदगुरू तुकोबाराय साहित्य रत्न’ हा पुरस्कार नुकताच जाहीर केला असून महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार कररून अभिनंदन करण्यात आले.

या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, यापूर्वी श्री यशवंतराव ग्रामविकास व शिक्षण प्रसारक मंडळ करकाळा ता. उमरी जि. नांदेड च्या वतीने मागील पंधरा वर्षापासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘लोकसंवाद पुरस्कार’ जाहीर केला असून होता.आता या दुस-या मराठा सेवा संघ प्रणित जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद बीड परिषदेच्या पहिल्या पुरस्काराचे मानकरी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात उच्च शिक्षणात ‘फुले पॅटर्न’ निर्माण करणारे अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षणतज्ज्ञ , मराठीचे साहित्यिक समीक्षक व ललित लेखक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे ठरले आहेत .

या पुरस्काराचा वितरण समारंभ दि. २ फेब्रुवारी २०२१ रोजी ‘अग्निपंख’ स्पर्धा परीक्षा केंद्र, अंबाजोगाई येथे परिषदेचे जिल्हाध्यक्ष शिवश्री विश्वंभर वराट व सचिव शिवश्री प्रमोद जाधव व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असून या पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह, शाल व सन्मानपत्र असे आहे. परिषदेचा या पुरस्काराचा पहिला बहुमान महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांना मिळाल्याबद्दल त्यांचा महाविद्यालयाच्या वतीने उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी यांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले व पुढील शैक्षणिक व साहित्यिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या .

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागातील सहयोगी प्रा. डॉ. अनिल मुंडे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले . यावेळी डॉ. नागराज मुळे, डॉ. सतीश ससाणे, डॉ . मारोती कसाब , ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे, डॉ. ए .एस. मोरे, डॉ. संतोष पाटील, डॉ. बब्रुवान मोरे , डॉ. पी. पी. चौकटे, प्रा.ए. सी. आकडे, डॉ. डी. एन. माने, डॉ. सचिन गर्जे, कार्यालय अधिक्षक प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, चंद्रकांत धुमाळे, वामन मलकापुरे, शिवाजी चोपडे, चंद्रकांत शिंपी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!