कल्याण मटका जुगारावर छापा; १,१३,८८० रुपयाचा मुद्येमाल जप्त

कल्याण मटका जुगारावर छापा; १,१३,८८० रुपयाचा मुद्येमाल जप्त

पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांच्या आदेशाने जिल्ह्यातील अवैध धंदयाना आळा घालण्यासाठी विशेष मोहीमे अतर्गत विशेष पथकातील पोलीसांनी किल्लारी येथील तीन ठिकाणी कल्याण मटका जुगारावर छापा मारला. ज्यात ४ आरोपीसह १ मोटार सायकल, ४ मोबाईल व रोख ९८८० रुपयाचा मुद्येमाल पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.

सविस्तर माहिती अशी की, दि. २७ जानेवारी रोजी मौजे किल्लारी ता. औसा हाद्यीत गुप्त माहीती काढुन १४.३० वा सुमारास शाम टि हाऊस किल्लारी पाटी येथे इसम नामे १.शिवराज शेषेराव गिरी (वय २) रा. किल्लारी भाग २ ता.औसा २. सुमित शेषेराव गिरी (वय १९) रा- किल्लारी भाग २ ता.औसा हे हॉटेल शाम टि हाऊस किल्लारी पाटी मध्ये स्वताःचे फायदयासाठी लोकांकडून पैसे घेवून आकडयावर लावुन कल्याण नावाचा मटका जुगार खेळत व खेळवित असताना रंगेहात सापडले यात रोख रक्कम ४३२० व विवो, अपो ए ५३ कंपनीचे २ मोबाईल किंमंत अंदाजे २२,०००/- रुपये व साहीत्य असा एकुण २६२२०/- रुपयाचा मुद्येमाल जप्त करुन सदर आरोपीतां विरुध्द पो स्टे किल्लारी येथे गुरंन २४/२१ कलम १२ (अ) मुंबई जुगार कायदयाप्रमाणे गुन्हा नोद केला आहे.

२७ जानेवारी रोजी औसा तालुक्यातील दुसरी घटना मौजे किल्लारी हाद्यीत गुप्त माहीती काढुन १५.१० वा सुमारास किल्लारी येथे इसम नामे १) संजय माधव लांडगे (वय ४४) रा. साखर कारखाना वस्ती किल्लारी हा स्वताःचे फायदयासाठी लोकांकडुन पैसे घेवुन आकडयावर लावुन कल्याण नावाचा मटका जुगार खेळत व खेळवित असताना रंगेहात मिळून आले यात रोख रक्कम ३१९० व कार्बन कंपनीचा १ मोबाईल किंमत अंदाजे १,०००/- रुपये साहीत्य असा एकुण ४१९० रुपयाचा मुद्येमाल जप्त करुन सदर आरोपी विरुध्द पो स्टे किल्लारी येथे गुरंन २५/२१ कलम १२ (अ)मुंबई जुगार कायदयाप्रमाणे गुन्हा नोद करण्यात आला आहे.

२७ जानेवारी रोजी मौजे किल्लारी ता. औसा हाद्यीत गुप्त माहीती काढुन १६.०० वा सुमारास किल्लारी पाटी येथे तळणी जाणारे रोडलगत हॉटेल मध्ये इसम नामे अमोल ज्ञानदेव क्षिरसागर वय २७ वर्ष रा. किल्लारी ता.औसा हा स्वताःचे फायदयासाठी लोकांकडून पैसे घेवुन आकडयावर लावून कल्याण नावाचा मटका जुगार खेळत व खेळवित असताना रंगेहात मिळुून आले यात रोख रक्कम १३३७० व अपो एफ ५ कंपनीचा १ मोबाईल किंमंत अंदाजे ११०००/-रुपये व १ हिरो फॅशन एक्स प्रो कंपनीची मोटार सायकल अंदाजे किमंत ७०,००० रुपये असा एकुण ८३३७०/- रुपयाचा मुद्येमाल जप्त करुन सदर आरोपी विरुध्द पो स्टे किल्लारी येथे गुरंन २६/२१ कलम १२ (अ)मुंबई जुगार कायदयाप्रमाणे गुन्हा नोद केला आहे.

About The Author

error: Content is protected !!