मराठवाडा इतिहास परिषदेच्या संपादक मंडळावर डॉ. बब्रुवान मोरे यांची निवड

मराठवाडा इतिहास परिषदेच्या संपादक मंडळावर डॉ. बब्रुवान मोरे यांची निवड

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख तथा इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ.बब्रुवान मोरे यांची मराठवाडा इतिहास परिषदेच्या संशोधन मासिकाच्या संपादक मंडळावर नुकतीच निवड झाली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की , डॉ.बब्रुवान मोरे हे २००६ पासून महात्मा फुले महाविद्यालयात इतिहास विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत विविध समित्यावर कार्य केले असून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या बहिस्थ एम .ए.पाठ्यक्रम ग्रंथाचे लेखनही त्यांनी केले आहे. तसेच ते संशोधन मार्गदर्शक ही आहेत व जवळपास तीसहून अधिक शोधनिबंध त्यांचे प्रकाशित आहेत. एक नवलेखक इतिहासकार म्हणून त्यांची ख्याती आहे. मराठवाडा इतिहास परिषदेच्या संपादक मंडळावर निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. मारोती कसाब यांनी केले तर आभार ग्रंथपाल प्रा.परमेश्वर इंगळे यांनी मानले यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author