कास्टिंग डायरेक्टरने अश्लील व्हिडिओ बनवून तरुणीवर केला बलात्कार

कास्टिंग डायरेक्टरने अश्लील व्हिडिओ बनवून तरुणीवर केला बलात्कार

पुणे (प्रकाश इगवे) : फिल्म इंडस्ट्रीत बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीला मित्राच्या फ्लॅटवर पार्टी करण्यासाठी घेऊन जाऊन तेथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर अश्लील व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने वारंवार या तरुणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी | पोलिसांनी अमित प्रेमचंद सिटलानी (वय ४०, रा. मधुबन सोसायटी, कळस) | याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कात्रज कोंढवा रोडवर राहणाऱ्या २१ वर्षांच्या तरुणीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मे २०१७ पासून | २६ मार्च २०२२ पर्यंत सुरू होता. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये बॅकस्टेज ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करते. अमित सिटलानी हा कास्टिंग दिग्दर्शक म्हणून काम करतो. एका मित्राच्या ओळखीतून त्यांची ओळख झाली होती. अमित सिटलानी याने फिर्यादी यांना मे २०१७ मध्ये टिंगरेनगर येथील मित्राच्या फ्लॅटवर पार्टीसाठी नेले. तेथे त्याने फिर्यादीला बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्याने याचा अश्लील व्हिडिओ बनवला होता. त्यानंतर २०१८ पासून त्याने हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादी यांना तो वेगवेगळ्या हॉटेलवर बोलवायचा इस्ट फिल हॉटेल, विमाननगर व स्काय व्हिस्टा हॉटेल, खराडी येथे घेऊन जाऊन फिर्यादी यांच्याशी त्याने जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. यावेळी फिर्यादी यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!