दिघी परिसरातील दहा घरफोड्या झाल्या उघड
पिंपरी (रफिक शेख) : चाकण, आळंदी, दिघी परिसरातील दहा घरफोड्या उघडकीस आल्या आहेत. यातून सात लाख ८० हजार रुपये सोन्याचे दागिने जप्त केले. पिंपरी चिंचवड पोलीस, गुन्हे शाखा युनिट-उने ही कारवाई केली. सचिन ऊर्फ लंगड्या गोरक्षनाथ काळे (५०) घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले. असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण, आळंदी, दिघी परिसरात |घरफोड्या करणारा सचिन काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो मागील एक गुन्ह्यात महिन्यापासून घरफोडीच्या येरवडा कारागृहात असल्याची माहिती युनिट ३च्या पोलिसांना मिळाली. पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने आरोपी काळेला ताब्यात घेतले. सखोल तपासाअंती दहा पोलिसांनी आरोपीकडून सात लाख ८० हजार रुपयांचे दागिने जप्त केले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर, पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले, यदू आढारी, सचिन मोरे, विठ्ठल सानप, ऋषिकेश भोसुरे, अनिल लांडे, महेश भालधिम, सागर जैनक, योगेश्वर कोळेकर, राजकुमार हनमंते, त्रिनयन बाळसराफ, राहुल सूर्यवंशी, रामदास मेरगळ, शशिकांत नांगरे यांनी केली.